शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:36 IST

पाकिस्तानी वंशाचे अब्जाधीश उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि भाजपाचे प्रचारसभा सुरू आहेत. चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दरम्यान,पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. 'नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेते आहेत त्यांनी भारताला नवीन उंचीवर नेले आहे आणि ते नक्कीच देशाचे तिसरे पंतप्रधान असतील. पंतप्रधान मोदी हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी चांगले नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता पाकिस्तानला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक चांगले पंतप्रधान तसेच भारतातील सर्वात शक्तिशाली नेते आहेत असं बाल्टिमोरमधील पाकिस्तानी वंशाचे व्यापारी साजिद तरार म्हणाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचे भाकीतही त्यांनी केले. ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानला भेट देणारे आणि आपली राजकीय विश्वासार्हता पणाला लावणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत. मला आशा आहे की मोदीजी पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार सुरू करतील, असंही साजिद तरार म्हणाले. 

Canada सरकारनं भारतीय कंपनीला ठोठावला लाखो डॉलर्सचा दंड, का अडकली Infosys?

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. पाकव्याप्त काश्मीरसह (पीओके) देशाच्या अनेक भागात अशांतता निर्माण झाली आहे. साजिद तरारम्हणाले, "पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. पेट्रोलच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. आयएमएफला कर वाढवायचे आहेत. विजेच्या किमती वाढल्या आहेत. आम्ही निर्यात करू शकत नाही. पीओकेमध्ये मुख्यत्वे आंदोलनामुळे वीज बिलात वाढ झाली आहे.

पीओकेमधील लोकांना आर्थिक मदत देण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या निर्णयावरही साजिद तरार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "पैसा कुठून आणणार? ते आयएमएफसोबत नवीन मदत पॅकेजवर चर्चा करत आहेत. पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. अशा वाईट काळात शाहबाज शरीफ यांचा हा निर्णय योग्य नाही, असंही साजिद तरार म्हणाले. 

साजिद तरार म्हणाले, "खेदाची गोष्ट आहे की, पाकिस्तानमध्ये तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. निर्यात कशी वाढवायची? दहशतवादावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सुधारायची, या मुद्द्यांवर चर्चा होऊन काम झाले पाहिजे. सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता आणि राजकीय अस्थिरता आहे. तरार म्हणाले, या सर्व समस्यांपासून दूर राहून पुढच्या स्तरावर नेणारे नेतृत्व मिळावे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४