शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:57 IST

Pakistani Army Medals: तुम्ही अनेकदा पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांच्या छातीवर अनेक पदके पाहिली असतील.

Pakistani Army :पाकिस्ताननेभारताविरोधात अनेक युद्धे लढली आहेत अन् प्रत्येकवेळी पराभवाचा सामना करावा लागला आहे. केवळ भारतच नाही, तर जेव्हा जेव्हा पाकिस्तान इतर देशांशी सामना करतो, तेव्हा तेव्हा पाकिस्तानी सैन्याला पराभवाला सामोरे जावे लागते. तरीदेखील पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकारी आपल्या छातीवर अनेक पदके लावून फिरतात. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, एकही युद्ध न जिंकणाऱ्या पाकिस्तानचे सैन्य अधिकारी आपल्या छातीवर इतकी पदके का लावतात? चला तर मग जाणून घेऊया पाकिस्तानी सैन्याच्या या पदकांमागील कहाणी काय आहे...

पाकिस्तानचा अनेक युद्धात पराभवभारत-पाकिस्तान युद्ध (1947-48), भारत-पाकिस्तान युद्ध (1965), भारत-पाकिस्तान युद्ध (1971) आणि कारगिल युद्ध (1999) मध्ये पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आहे. याशिवा पाकिस्तानला अनेकप्रसंगी राजनैतिक पराभवालाही सामोरे जावे लागले आहे.

पाकिस्तान अधिकाऱ्यांना पदके का देतो?प्रत्येक देशाचे सैन्य त्यांच्या सैनिकांना त्यांची सेवा, शौर्य इत्यादी लक्षात घेऊन पदके देते. उदाहरणार्थ, युद्धात सहभाग, शौर्य किंवा विशेष ऑपरेशन्समध्ये योगदान दिल्याबद्दल पदके दिली जातात. याच कारणास्तव, पराभवानंतरही पाकिस्तानमधील अनेक सैनिकांना पदके देण्यात आली आहेत. याशिवाय, केवळ युद्धासाठीच नाही, तर पाकिस्तानच्या ऑपरेशन झर्ब-ए-अज्ब सारख्या अंतर्गत कारवायांसाठीदेखील पदके दिली जातात. पदके ही प्रत्येक देशाच्या सैन्यातील परंपरेचा भाग आहे.

ज्याप्रमाणे भारताने अनेक वर्षांपासून कोणतेही युद्ध लढलेले नाही, पण तरीही सैनिकांना शांतता काळातील पदके दिली जातात, तसेच पाकिस्तानमध्येही घडते. पाकिस्तानी लष्कराने 1947, 1965, 1971 च्या युद्धांसाठी, तसेच 1970 च्या बलुचिस्तानमधील ऑपरेशन, सियाचीन वाद, शिया बंडखोरी, अंतर्गत बाबी इत्यादींसाठी आपल्या सैनिकांना पुरस्कार दिले आहेत.

पाकिस्तान किती प्रकारची पदके देतो?पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार निशान-ए-हैदर आहे. हे पदक फक्त पाकिस्तान सशस्त्र दलाच्या सदस्यांना दिले जाते. हा पुरस्कार असाधारण शौर्यासाठी दिले जाते. यानंतर हिलाल-ए-जुरत, सितारा-ए-जुरत, तमघा-ए-जुरत आणि इम्तियाजी पदके दिली जातात. नॉन-ऑपरेशनल पुरस्कारांमध्ये सितारा-ए-बिसलत, तमघा-ए-बिसलत, तमघा-ए-खिदमत वर्ग-1, तमघा-ए-खिदमत वर्ग-2, तमघा-ए-खिदमत वर्ग-3 यांचा समावेश आहे. तर, नागरी लष्करी पुरस्कारांमध्ये निशान-ए-इम्तियाज, हिलाल-ए-इम्तियाज, सितारा-ए-इम्तियाज, तमघा-ए-इम्तियाज, तमघा-ए-खिदमत यांचा समावेश आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध