आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानला आता त्यांच्याच मित्रदेशांनी आरसा दाखवायला सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरातीने दिलेले ३.५ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागितल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. मात्र, ही मदत मान्य करण्याऐवजी पाकिस्तानी खासदार मुशाहिद हुसैन यांनी चक्क युएईलाच 'अखंड भारता'ची भीती दाखवत तिखट शब्दांत टीका केली आहे.इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर युएईने पाकिस्तानला दिलेल्या ३५० कोटी (३.५ अब्ज) डॉलर्सच्या कर्जाची मुदत संपल्याने ते परत देण्याची मागणी केली होती. पाकिस्तानने हे कर्ज परत करण्याचे मान्य केले असले तरी, या मागणीमुळे पाकिस्तानी नेत्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.
एका टीव्ही चर्चेदरम्यान खासदार मुशाहिद हुसैन यांनी युएईचा उल्लेख वारंवार 'बिचारा देश' असा केला. ते म्हणाले, "युएई उभा करण्यात आमचा मोठा वाटा आहे, आम्ही त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण दिले आहे. आता तेच आम्हाला कर्ज परत मागत आहेत?" एवढ्यावरच न थांबता त्यांनी युएईला भारताच्या वाढत्या जवळकीवरून टोला लगावला.
'अखंड भारता'चा उल्लेख करत दिला इशाराहुसैन पुढे म्हणाले, "युएईची लोकसंख्या १ कोटी आहे, त्यापैकी 23 लाख लोक भारतीय आहेत. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. भारताशी असलेली ही मैत्री त्यांना 'अखंड भारता'चा भाग बनवून टाकेल."
एकीकडे जगभरातून कर्ज मिळवण्यासाठी झोळी पसरणाऱ्या पाकिस्तानच्या लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात देणाऱ्या देशालाच अशा प्रकारे धमकावल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर 'नमक हराम' असल्याची टीका होत आहे.
Web Summary : UAE's loan recall irked Pakistani MP Mushahid Hussain. He warned UAE about its ties with India, mentioning 'Akhand Bharat,' sparking controversy and criticism.
Web Summary : यूएई द्वारा कर्ज वापस मांगने पर पाकिस्तानी सांसद मुशाहिद हुसैन भड़क गए। उन्होंने यूएई को 'अखंड भारत' का हवाला देते हुए भारत से संबंधों पर चेतावनी दी, जिससे विवाद हो गया।