ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या ब्रह्मोससारख्या सुपरसोनिक क्रूझ मिसाईलने धूळ चारल्यानंतर, पाकिस्तानच्या लष्कराचा 'मेड इन चायना' मिसाईल आणि शस्त्रांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता पाकिस्तानी मिसाईल वैज्ञानिक भारतीय मिसाईलची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मुनीर यांच्या लष्कराने नुकताच दावा केला होता की त्यांनी भारताच्या अग्नि-५ सारखी मिसाईल तयार केली आहे. पण गंमत म्हणजे, या मिसाईलची चाचणी घेताच ती हवेत उडण्याऐवजी थेट जमिनीवर कोसळली.
असा प्रकार पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच घडलेला नाही. पाकिस्तानच्या मिसाईल वारंवार पाकिस्तानमध्येच धडाम होत आहेत. एकट्या जुलै महिन्यातच पाकिस्तानमध्ये २ मिसाईल अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानची शाहीन-३ मिसाईल चाचणीदरम्यान बलुचिस्तानमधील अणुप्रकल्पाच्या अगदी जवळ कोसळली होती आणि आता पाकिस्तानच्या अबाबील मिसाईलची चाचणीही धोकादायक पद्धतीने अपयशी ठरली आहे.
भारताची नक्कल का नाही जमणार?
जेव्हा भारत ब्रह्मोस डागतो, तेव्हा शत्रूच्या गोटात काय होते... याचं उत्तर ऑपरेशन सिंदूरदरम्यान आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ या दोघांनाही चांगल्याप्रकारे मिळालं आहे. पण जेव्हा पाकिस्तान मिसाईल डागतो, तेव्हा काय होतं? याचं उत्तर पाकिस्तान स्वतःच वारंवार देत असतो. त्यांच्या मिसाईल चाचणीदरम्यानच फुस होत आहेत.
अबाबील मिसाईलची १३वी चाचणी फेल!
पाकिस्तानच्या मिसाईलमध्ये किती ताकद आहे, त्या काय करू शकतात. याचं उत्तर पाकिस्तानच्या अबाबील चाचणीच्या व्हिडिओमधून मिळालं आहे, ज्यात ही मिसाईल फेल होताना दिसत आहे. ना शहबाजचे वैज्ञानिक काही करू शकले, ना असीम मुनीरचं पाकिस्तानी सैन्य. ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या हवेतील दाव्यांची पोलखोल झाली, त्याचप्रकारे आता पाकिस्तानच्या खोट्या अणुबॉम्बच्या ताकदीची हवा निघाली आहे. कारण अणुबॉम्ब घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या पाकिस्तानच्या प्रत्येक मिसाईल पाकिस्तानसाठीच धोका बनून जमिनीवर कोसळत आहे. पाकिस्तानची अबाबील मिसाईल ही अग्नि-५ मिसाईलची कॉपी-पेस्ट व्हर्जन होती.
भारताच्या मिसाईलची नक्कल करण्याची वेळ का आली?
पाकिस्तानने भारताला लक्ष्य करून चीनकडून खरेदी केलेल्या पीएल १५ मिसाईल डागल्या होत्या. चीनच्या एचक्यु ८ एअर डिफेन्स सिस्टिममधून मिसाईल डागण्यात आल्या, तसेच फतह आणि बाबर सारख्या मिसाईलचाही वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या लष्कराने आपली संपूर्ण मिसाईल ताकद पणाला लावली होती, पण मुनीर सैन्याच्या शस्त्रागारामध्ये ठेवलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या मिसाईलचा स्ट्राइक रेट शून्य असल्याचे सिद्ध झाले. पाकिस्तानच्या मिसाईल एकतर त्यांच्याच सीमेत कोसळल्या किंवा भारताच्या थोड्याच आत येऊन पडल्या. बाकीच्यांना भारताच्या एस-४००ने ढिगारा बनवून टाकले. आपल्या मिसाईल निकामी होताना पाहून, आता पाकिस्तान भारताच्या मिसाईलची नक्कल करत आहे. अबाबील मिसाईलही याच दिशेने एक पाऊल मानले जात आहे.