शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पाकिस्तानात ट्रेन हायजॅक, शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत 6 सैनिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:49 IST

Pakistan Train Hijack: ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे सक्रिय कर्मचारी सामील आहेत.

Pakistan Train Hijack :पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली आहे. या ट्रेनमध्ये शेकडो प्रवासी असून, बलुच आर्मीने या सर्व प्रवाशांनाही ओलीस ठेवले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर ट्रेन हायजॅकची माहिती दिली. पाकिस्तानी सैन्य या ओलीसांची सुटका करण्याचे प्रयत्न करत आहे.

...तर ओलिसांना ठार करूपाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असताना ही घटना घडली. बलुच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करुन ही माहिती दिली. पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला, तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील, अशी धमकीही दिली आहे.

ट्रॅक उडवून ट्रेन थांबवली अन्...बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करून म्हटले की, मशकाफ, धादर आणि बोलानमध्ये ट्रेन हायजॅक करण्यात आले आहे. आमच्या सैनिकांनी आधी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवून दिला, त्यानंतर ट्रेन थांबताच ताब्यात घेतले. ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य कर्मचारी देखील आहेत. हे सर्व सुट्टीवर पंजाबला जात होते. 

6 सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही हत्या बलुच लिबरेशन आर्मीने सांगितले की, हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे. आतापर्यंत सहा जवान शहीद झाले असून, शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. बीएलएचे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्लाCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय