शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पाकिस्तान : पेशावर युनिव्हर्सिटीजवळ दहशतवादी हल्ला, 11 जणांचा मृत्यू; 35 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 14:27 IST

पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे

पेशावर: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीवर हा हल्ला झालाय. हल्ला करणा-या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पण दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला तर जवळपास 35 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या arynews ने याबाबत वृत्त दिलं आहे.  तहरीक-ए-तालिबान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे. पेशावर कृषी संचालनालयाच्या इमारतीकडे जाणारा रस्ता प्रशासनाने बंद केला आहे. पोलीस आणि पाकिस्तानी सेनेने इमारतीला वेढा घातला आहे.  जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.    जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी गोळीबाराला सुरूवात झाली. गोळीबाराचा आवाज ऐकून आम्ही पळण्याचा प्रयत्न केला पण माझे दोन मित्र गोळीबारात जखमी झाले अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. गेल्या आठवड्यात पेशावरमध्ये झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी हयाताबाद येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहम्मद अशरफ नूर यांचा मृत्यू झाला होता.   

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी