वॉशिंग्टन : पठाणकोट हल्ल्याप्रकरणी तपास करीत असलेले पाकिस्तानी पथक येत्या काही दिवसांत भारताचा दौरा करू शकते, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेची तारीख लवकरच निश्चित होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. अमेरिका-पाकिस्तान व्यूहात्मक चर्चेदरम्यान प्राथमिक टिपणी करताना अजीज म्हणाले की, चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना पठाणकोट हल्ल्यांमुळे धक्का बसणे ही दुर्दैवी बाब आहे. पंतप्रधान शरीफ यांनी हल्ल्यानंतर तात्काळ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून चौकशीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
पाकचे पथक भारत दौऱ्यावर येणार
By admin | Updated: March 2, 2016 02:34 IST