शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:08 IST

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.

इस्लामाबाद - इस्त्रायलविरोधात सैन्य संघर्षात इराणलाचीन आणि रशियानंतर आता पाकिस्तानची साथ मिळाली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इराणचे राष्ट्रपती मसूज पेजेक्शियन यांच्याशी संवाद साधला. इस्त्रायलकडून होणारे हल्ले उकसवण्याचा प्रकार असल्याचे पाकिस्तानने म्हटले. त्यासोबतच इस्त्रायलविरोधात मुस्लीम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन पाकिस्तानने केले आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणच्या अण्वस्त्र सेंटर आणि सैन्य तळांवर हल्ले केले. त्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य प्रमुख आणि अण्वस्त्र वैज्ञानिक मारले गेले. इराणनेही या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलच्या तेल अवीव या प्रमुख शहरांवर मिसाईल हल्ले केले.

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. हा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देणारा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचेही उल्लंघन केले आहे. इस्त्रायलने विनाकारण केलेल्या हल्ल्याविरोधात पाकिस्तान इराणसोबत एकजुटीने उभा आहे. इराणला आत्मरक्षणाचा अधिकार आहे. इस्त्रायल प्रादेशिक, जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे असा आरोपही शहबाज शरीफ यांनी केला.

तसेच शहबाज यांनी जागतिक समुदायाकडे, संयुक्त राष्ट्र आणि मुस्लिम देशांना इस्त्रायलविरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याबाबत भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे शरीफ यांनी म्हटलं. तर इराणचे राष्ट्रपती यांनीही कठीण काळात आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत इराणची साथ दिल्याबद्दल पाकिस्तानचे आभार मानले आहेत. शरीफ यांच्या भूमिकेने दोन्ही देशातील संबंध आणखी घनिष्ठ झाल्याचे हे दिसून येते असंही त्यांनी म्हटलं.

पाश्चात्य देशांना इराणचा मोठा इशारा

दरम्यान, या तणावाच्या परिस्थितीत इराणने पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. पाश्चात्य देशांनी जर इस्त्रायलला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. जर पाश्चात्य देशांनी इस्त्रायलवर होणारे इराणी हल्ले रोखण्यास मदत केली तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सच्या सैन्य ठिकाणांवर आणि त्यांच्या युद्धनौकांवर टार्गेट हल्ला करण्यात येईल असं इराणने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलPakistanपाकिस्तानchinaचीनrussiaरशिया