शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Pakistan Imran Khan : 'संसद बरखास्त करण्याचा निर्णय असंवैधानिक'; इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 21:41 IST

Pakistan Imran Khan : इम्रान खान यांना करावा लागणार अविश्वास प्रस्तावावर मतदानाचा सामना.

Pakistan Imran Khan : पाकिस्तानातील राजकीय संकटादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना झटका दिला आहे. उपसभापतींचा निर्णय असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. आता येत्या ९ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान केलं जाणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्ही अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यासाठी तयार आहोत असं पीटीआयच्या एका नेत्यानं सांगितलं.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित झाली आहे. यासह इम्रान खान हे पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले आहेत. "पंतप्रधान संविधानाला बांधिल आहेत. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षांना संसद बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकत नाहीत. जर अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यास नव्य पंतप्रधानांची निवड केली जावी," असं न्यायालयाने म्हटले आहे. "या निर्णयानंतर पाकिस्तानचा बचाव झाला आहे. पाकिस्तानच्या लोकांच्या प्रार्थना कामी आल्या. अविश्वास ठरावादरम्यान आम्ही एक सरप्राईज देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर नॅशनल असेंबली अधिक मजबूत होईल," असं असेंबलीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ म्हणाले.निर्णय मान्य असेलसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या कायदेशीर टीमसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आपल्याला आणि पक्षाला मान्य असेल, असं सांगितलं. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी विरोधकांनीही एका बैठकीचं आयोजन केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी साडेसात वाजता पीएमएल-एनच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीसाठी बिलावल भुट्टो, आसिफ जरदारी आणि मौलाना फजलुर रहमान यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय