शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद बनला पाकिस्तानसाठी डोकेदुखी! दोन दिवसांत पोलीस अधिकाऱ्यासह ७ जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 17:22 IST

Pakistan Terrorism: सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शाहबाज शरीफ सरकार विरोधकांच्या निशाण्यावर

Pakistan Terrorism: पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचा आरोप  या देशावर वारंवार केला जातो. भारतच नव्हे तर इतरही काही देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा संबंध असल्याचा दावा केला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून दहशतदावाद हा मुद्दा पाकिस्तानसाठीच डोकेदुखी ठरतानाच दिसत आहे. अलीकडेच खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात ५ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी गेल्या दोन दिवसांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 6 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतातील अशांत भागातही हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना पोलिसांनी १२ दहशतवाद्यांनाही ठार केले आहे.

पाकिस्तान सशस्त्र दलाची मीडिया शाखा इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने रविवारी सांगितले की बलुचिस्तान प्रांतातील दोन घटनांमध्ये चार दहशतवादी मारले गेले आहेत. खैबर पख्तुनख्वा (KP) मध्ये स्थित डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची तहसीलच्या कोट सुलतान भागात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत आठ दहशतवादी मारले गेले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

लक्की मारवत येथे दोन हल्ले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री खैबर पख्तुनख्वामधील लक्की मारवत येथे दोन हल्ले केले. यामध्ये एक पोलिस अधीक्षक (डीएसपी) आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला, तर एक हवालदार जखमी झाला. ईद-उल-फित्रच्या आधी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी डीएसपीने इतर पोलिस कर्मचाऱ्यांसह पेशावर-कराची महामार्गावर तात्पुरती चौकी उभारली होती.

मंजीवाला चौकाजवळ डीएसपीवर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टवरून परतत असताना मंजीवाला चौकाजवळ अगोदरच घुसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. या घटनेत डीएसपी आणि कॉन्स्टेबल नसीम गुल यांचा मृत्यू झाला. याआधी शुक्रवारी रात्री सारा दर्गा परिसरातही दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी कॉन्स्टेबल सनमत खान यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर शनिवारी बाजौर जिल्ह्यातील मामुंद तालुक्यात स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. या स्फोटात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. शनिवारी रात्रीच टँक जिल्ह्यातील मियाँ लाल पोलिस चौकीजवळ काही अज्ञातांनी एका हेड कॉन्स्टेबलची हत्या केली होती.

शहबाज सरकार विरोधकांच्या निशाण्यावर 

अशाप्रकारे गेल्या दोन दिवसांत एका पोलिस अधिकाऱ्यासह 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लक्की मारवत येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. पण पाकिस्तानमध्ये सातत्याने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे शाहबाज शरीफ सरकारही विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद