शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

190 हिंदूंना पाकने भारतात येण्यापासून रोखले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:08 IST

Pakistan : 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात यायचे होते.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना येथील अडचणींचा सामना नेहमीच करावा लागत आहे. यासंदर्भात आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहणाऱ्या 190 हिंदूंना येथील अधिकाऱ्यांकडून भारतात येण्यापासून रोखण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लोक कथितरित्या भारताला भेट देण्याच्या उद्देशाबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत, असे कारण पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांनी समोर केले आहे.

'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, सिंधच्या अनेक भागातून मुले आणि महिलांसह विविध हिंदू कुटुंबे मंगळवारी वाघा सीमेवर पोहोचली. त्यांच्याकडे व्हिसा होता आणि त्यांना तीर्थयात्रेसाठी भारतात यायचे होते. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना भारतात का जायचे आहे, याचे योग्य कारण सांगता न आल्याने त्यांना परवानगी दिली नाही. वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हिंदू कुटुंबे अनेकदा धार्मिक यात्रेच्या नावाखाली व्हिसा घेतात आणि नंतर बराच काळ भारतात राहतात. सध्या मोठ्या संख्येने पाकिस्तानी हिंदू राजस्थान आणि दिल्लीत भटक्यासारखे राहत आहेत.

पाकिस्तानात अनेक हिंदू राहतात'सेंटर फॉर पीस अँड जस्टिस पाकिस्तान'च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समुदायाची लोकसंख्या 22,10,566 आहे, जी देशातील एकूण नोंदणीकृत लोकसंख्येच्या 1.18 टक्के आहे. पाकिस्तानची नोंदणीकृत लोकसंख्या 18,68,90,601 आहे. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या गरीब आहे आणि देशाच्या विधिमंडळात त्यांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात राहते, जिथे त्यांची संस्कृती, परंपरा आणि भाषा मुस्लिम रहिवाशांसोबत जुळते. दरम्यान, येथील हिंदू व्यक्ती अनेकदा अतिरेक्यांच्या छळाची तक्रारही करतात.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत