शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान पुन्हा हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची अज्ञातांकडून हत्या; आठवड्यातील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:50 IST

महिनाभरात तिसऱ्या दहशतवाद्यांच्या म्होरक्याची हत्या. पाकिस्तानमध्ये आता दहशतवाद्यांचेही काही खरे दिसत नाहीय.

पाकिस्तानमध्ये आता दहशतवाद्यांचेही काही खरे दिसत नाहीय. भारतात वारंवार दहशतवादी हल्ले करणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अकरम खान उर्फ अकरम गाझी असे या कमांडरचे नाव असून तो भारतात हल्ले करण्यासाठी २०१८ ते २०२० पर्यंत दहशतवाद्यांच्या भरतीचे काम पाहत होता. तसेच भारताविरोधात गरळ ओकण्याचे काम करायचा. 

गाझीची गुरुवारी पाकिस्तानच्या बाजौरमध्ये हत्या करण्यात आली. अकरम हा लष्करच्या टॉपच्या कमांडरांपैकी एक होता. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतविरोधी कृत्यांमध्ये सहभागी होता. 

पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले आहे. रविवारीच जम्मू-काश्मीरमधील सुजवान येथे २०१८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ख्वाजा शाहिदचे अपहरण करण्यात आले होते. त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ सापडला.

गेल्या महिन्यात भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ पाकिस्तानमध्ये ठार झाला होता. लतीफची सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. 2016 मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा लतीफ मास्टरमाइंड होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी