शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 16:33 IST

राफेल विमानं दाखल झाल्यानं भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ; बिथरला पाकिस्तान

इस्‍लामाबाद: पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव वाढल्यानं भारतानं फ्रान्सला तातडीनं राफेल लढाऊ विमानं पाठवण्याची विनंती केली. चीनच्या कुरघोड्या सुरुच असल्यानं भारतानं केलेली मागणी फ्रान्सनं लगेच पूर्ण केली. त्यानंतर काल पाच राफेल विमानांची तुकडी भारतात पोहोचली. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतीय हवाई दलानं राफेल विमानं हरयाणातल्या अंबाला तळावर तैनात केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागापासून चीन आणि पाकिस्तानला लक्ष्य करता येऊ शकतं. त्यामुळेच पाकिस्तानची चिंता वाढली आहे. भारत गरजेपेक्षा जास्त शस्त्रसाठा जमा करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. भारताला शस्त्रसाठा गोळा करण्यापासून रोखा. अन्यथा दक्षिण आशियात शस्त्रसाठा जमा करण्याची स्पर्धा सुरू होईल, असं आवाहन पाकिस्ताननं जगाला केलं आहे.फ्रान्सहून निघालेली पाच राफेल विमानं ७ हजार किलोमीटरचं अंतर कापून काल अंबालामध्ये पोहोचली. यामुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य वाढलं असलं, तरी पाकिस्तानी हवाई दलाची चिंता वाढली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल विमानं दाखल झाल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. भारतात राफेल विमानं पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुखांनी लष्कर प्रमुखांसोबत आपात्कालीन बैठक बोलावली.राफेलच्या आगमनामुळे पाकिस्तान चिंतातूर आहे. राफेल नसताना भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला होता. आता भारताच्या पराक्रमी हवाई दलात राफेल दाखल झालं आहे. इराक आणि लीबियामधील युद्धात राफेलनं धडाकेबाज कामगिरी केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाकडे अमेरिकेनं दिलेली एफ-१६ लढाऊ विमानं आहेत. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर झालेल्या चकमकीत पाकिस्ताननं हीच विमानं वापरली होती. त्यापैकी एक विमान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी मोठ्या कौशल्यानं जमीनदोस्त केलं होतं. 

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दल