शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पाकने ब्रिक्स जाहीरनामा फेटाळला, अतिरेक्यांना संरक्षण देत नसल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:50 IST

आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने मंगळवारी चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे.

इस्लामाबाद : आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने मंगळवारी चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्टÑीय दबाव वाढत असतानाही पाकिस्तानने आपला हेका कायम ठेवला आहे.चीनच्या शीयामेन शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी केला होता. पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंताही व्यक्त केली होती.तालिबान, इस्लामिक स्टेट (इसिस), अल-कायदा, पूर्व तुर्किस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए- तोयबा, जैश-ए- मोहम्मद, तेहरिक- तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उत- तहरीर या अतिरेकी गटांनी चालविलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला निर्माण झालेल्या धोक्याचा उल्लेखही या जाहीरनाम्यात करण्यात आला होता.अफगाणिस्तानकडे अंगुलीनिर्देश...अतिरेक्यांसाठी अफगाणिस्तानातील ४० टक्के भूभाग सुरक्षित असल्याचे सांगत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी उपखंडातील हिंसाचारासाठी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांना जबाबदार धरले. ब्रिक्स सदस्यांनी जारी केलेला जाहीरनामा आम्ही फेटाळत आहोत, असे त्यांनी संरक्षण स्थायी समितीच्या बैठकीत म्हटले. काही गट देश सोडून गेले त्यांचा अपवाद वगळता पाकिस्तानने आपल्या भूमीवरील सर्व दहशतवादी गटांवर कारवाया केल्या आहेत, असा दावा दस्तगीर यांनी केल्याचे वृत्त जीईओ टीव्हीने दिले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद