शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:47 IST

भारतासोबत झालेल्या तणावाची माहिती देण्यासाठी पाकिस्तानचे खासदार विदेश दौऱ्यावर आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला, या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर भारताने या तणावाची माहिती देण्यासाठी  खासदारांचे शिष्टमंडळ विदेशात पाठवले. असेच एक शिष्टमंडळ पाकिस्ताननेही विदेशात पाठवले.

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता उघडपणे अमेरिकेकडे प्रगत शस्त्रास्त्र प्रणालींसाठी विनंती करत आहे. वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी शिष्टमंडळाचे सदस्य आणि नवाझ शरीफ मंत्रिमंडळातील मंत्री मुसादिक मलिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  या व्हिडीओमध्ये ते अमेरिकेला हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमाने विकण्याची विनंती करत आहेत.

पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

व्हायरल व्हिडिओमध्ये मलिक बोलत आहेत की, "भारत ८० विमाने आणि ४०० क्षेपणास्त्रांसह आला होता. यात ते क्षेपणास्त्र वाहने वाहून नेण्यास सक्षम आहेत. तुम्ही पाहिलं आहे आमच्यासोबत काय झालं असतं. आमच्याकडे जर एअर डिफेन्स सिस्टम नसती तर आम्ही आमचं नुकसा झालं असतं. भारत तंत्रज्ञानाचा वापर करतो. ते खूप प्रगत आहेत. तुम्ही तुमचे ते तंत्रज्ञान आणा, आम्ही तुमच्याकडून खरेदी करण्यास तयार आहोत, असंही ते या व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. 

मलिक हे परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन अधिकारी आणि कायदेकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावापाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ गेल्या अनेक दिवसांपासून भारताविरूद्धच्या तणावात पाकिस्तानचा विजय झाल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या या दाव्याला आता त्यांच्याच नेत्यांनी चुकीचे ठरवले आहे. 

'भारताने रावळपिंडीसह अनेक पाकिस्तानी भागांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, हे शाहबाज शरीफ यांनी स्वतः कबूल केले. ते म्हणाले, "भारताने त्यांचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र डागले, ते पाकिस्तानच्या विविध प्रांतांमध्ये पडले. रावळपिंडी विमानतळ देखील त्यात आहे."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिका