शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

बिथरलेल्या पाकची युद्धाची दर्पोक्ती; म्हणे, PoK वाचवण्यासाठी मोदी सरकारशी शेवटपर्यंत लढू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:59 IST

काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला.

इस्लामाबादः पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान पोहोचले असून, त्यांनी तिथल्या संसदेला संबोधितही केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.भारतानं असं काही केल्यास आम्हीही युद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचं इम्रान खान म्हणाले आहेत. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध झाल्यास त्याला संयुक्त राष्ट्र जबाबदार असेल. पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा हा जगातल्या प्रत्येक स्तरावर उपस्थित करत राहील. गरज पडल्यास आम्ही आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाऊ, येत्या काळात लंडनमध्ये मोठी रॅली काढण्यात येणार आहे. एकीकडे संयुक्त राष्ट्राची महासभा सुरू असेल, तर दुसरीकडे पाकिस्तान विरोध प्रदर्शन करेल. पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर सैरभैर झालेला असून, त्यांनी पुन्हा एकदा भाषणातून भारताला लक्ष्य केलं आहे. भाजपा आणि संघाची विचारधारा मुसलमानांच्या विरोधात आहे. ते भारतात राज्य करत आहेत. आमच्याकडून प्रत्येक मंचावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. मोदींना काश्मीरचा प्रश्न महागात पडणार असल्याचंही इम्रान खान म्हणाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ते म्हणाले, मी जगभरात काश्मीरसाठी आवाज उठवेन, प्रत्येकाला आरएसएसच्या विचारधारेसंदर्भात माहिती देईन. भाजपा भारतातल्या मुस्लिमांना आवाज दाबात आहे. त्यांना पाकिस्तानात जाण्याची धमकी दिली जात आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370