शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी घेणार नाहीत वेतन, देशातील आर्थिक संकट पाहता घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 11:01 IST

Pakistan President Asif Ali Zardari : पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

Pakistan President Asif Ali Zardari : पाकिस्तानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपले वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी आपल्या देशाची वाईट स्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अशा परिस्थितीत नवनिर्वाचित राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानमधील आव्हानात्मक आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रपतीपदाच्या काळात कोणतेही वेतन घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.

राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी वेतन न घेतल्याने पाकिस्तानला आर्थिक संकटातून वाचवता येणार नाही. पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाईचा मोठा सामना या देशाला करावा लागत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानवर असलेला कर्जाचा बोजा वाढत आहे. पाकिस्तानचे विदेशी कर्ज गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 1.2 अब्ज डॉलरने वाढून 86.35 अब्ज डॉलर होते. ज्यामध्ये जागतिक बँक आणि चीनचा सर्वाधिक वाटा होता.  68 वर्षीय आसिफ अली झरदारी यांनी गेल्या रविवारी 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. आसिफ अली झरदारी यांचा पक्ष पीपीपीने 'एक्स' वर लिहिले आहे की, राष्ट्रपतींनी विवेकपूर्ण आर्थिक व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्याचे आणि राष्ट्रीय महसुलावर भार न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रपतींच्या सचिवालय प्रेस विंगने सांगितले की, राष्ट्रीय महसुलावर बोजा पडू नये म्हणून राष्ट्रपतींनी वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानचे गृहमंत्रीही घेणार नाहीत वेतनपाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी इस्लामाबादमधील ऐवान-ए-सदर येथे आयोजित समारंभात दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. याशिवाय, आसिफ अली झरदारींच्या पावलावर पाऊल ठेवत गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही देशासमोरील आर्थिक आव्हानांचे कारण देत वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्यांदा बनले पाकिस्तानचे राष्ट्रपतीआसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती बनले आहेत. यापूर्वी 2008 ते 2013 दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे 11 वे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी त्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर पुढील राष्ट्रपतींना पदभार सोपवला होता. बेनझीर भुट्टो सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. मात्र, सरकार पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान