शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांचा पोलिसांना गुंगारा; अटक वॉरंट घेऊन आले, पण घरी सापडलेच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 06:11 IST

अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता, पोलिसांकडून सारवासारव.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी अटक करण्यासाठी पाकिस्तानचे पोलिस रविवारी त्यांच्या घरी पोहोचले, परंतु त्यापूर्वीच ते गायब झाले होते. अटक करणे हा मुळीच उद्देश नव्हता. अशी सारवासारव पोलिसांनी केली. एवढे झाल्यानंतर काही तासांनी इम्रान समर्थकांसमोर आले आणि त्यांनी सरकारचा आपली हत्या करण्याचा कट होता असा गंभीर आरोप केला.

इम्रान खान ७ मार्च रोजी न्यायालयात हजर होतील असे त्यांच्या कायदेशीर पथकाने आश्वासन दिल्यानंतर पोलीस त्यांच्या निवासस्थानावरून परतले.  इम्रान खान यांनी जमान पार्कमधील एका खोलीत स्वत:ला बंद करून घेतले. पोलीस जेव्हा नोटीस देण्यासाठी आले तेव्हा ते घरी नव्हते; पण पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते त्यांच्या घरातून हजर झाले हाेते, असा दावा खान यांचे कर्मचारी पथकाचे प्रमुख शिबली फराज तरार यांनी केला. 

इम्रान यांची टीकाइम्रान खान यांनी ट्वीट करून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्यावर हल्लाबोल केला.  ज्या देशामध्ये बदमाशांना राज्य चालवायला दिले जाते त्या देशाचे भविष्य काय असेल? शाहबाज शरीफ ८ अब्ज रुपयांच्या मनी लाँड्रिंग आणि १६ अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरणार होते. त्यामुळेच जनरल बाजवा यांनी सुनावणी पुढे ढकलून त्यांना पंतप्रधान केले, असा आरोप त्यांनी केला. 

‘तोशाखाना’तील वस्तू विकल्यासत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेटवस्तू प्रकरण निवडणूक आयोगाकडे उचलले होते. इम्रान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचा आरोप करण्यात आला. परंतु या भेटवस्तू तोशाखान्यातून (सरकारी तिजोरी) २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि त्याच्या विक्रीतून ५.८ कोटी रुपये मिळाल्याचा दावा इम्रान यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. नंतर ही रक्कम २० कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले होते.

कायदा सर्वांना समानइस्लामाबाद पोलिसांनी ट्वीट केले होते की, इस्लामाबाद पोलिस संरक्षणात खान यांना इस्लामाबादला स्थानांतरित करतील. कायदा सर्वांसाठी समान आहे. अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. खान यांच्याविराेधात २८ तारखेला अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात आला हाेता.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान