शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

पाकिस्तानात सत्तापालट अटळ? इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; गच्छंतीसाठी विरोधक एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 08:55 IST

अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या इम्रान खान यांचं पंतप्रधानपद धोक्यात; विरोधक एकवटल्यानं खान चिंतेत

इस्लामाबाद: पाकिस्तानात सत्ताबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. जवळपास सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून विरोधकांची आघाडी असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटनं सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान यांच्या घरातही सारं काही आलबेल नाही. त्यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी घर सोडून गेली आहे.

विरोधकांच्या आघाडीनं इम्रान खान सरकारविरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. विरोधकांच्या आघाडीत बिलावल अली झरदारी भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पक्ष, नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान सरकारमधील मित्र पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचा समावेश आहे. हे सारेच पक्ष सरकारविरोधात एकवटले आहेत.

कोणाला मिळणार पंतप्रधानपद?इम्रान खान यांना पंतप्रधानपद गमवावं लागल्यास त्यांच्या जागी पाकिस्तान पीपल्स पक्षाच्या आसिफ अली झरदारी यांना संधी मिळू शकते. माजी पंतप्रधान नवाज शरीफ आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत. निवडणुकीच्या आधी प्रचारात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची कबुली गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांनी दिली. खान यांनी याचं खापर प्रशासकीय यंत्रणेवर फोडलं. व्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळे देशात आवश्यक बदल घडवता आले नाहीत, असं खान यांनी म्हटलं होतं.

खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणणार असल्याच्या वृत्ताला पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटनं दुजोरा दिला. पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यासंदर्भात सरकारच्या मित्रपक्षांशीदेखील संपर्क साधणार आहेत. संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं अधिक मतदान व्हावं यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानात महागाई प्रचंड वाढली असून त्याचा फटका सामान्यांना बसत आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान