शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"पाकव्याप्त काश्मीर आपलं नाही, ती परकीय भूमी"; पाकिस्तानची मोठी कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 17:27 IST

एका अपहरण प्रकरणात पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलताना पाकिस्तान सरकारने मोठं विधान केलं आहे.

Pakistan On Pok: पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तिथल्या लोकांनी पाकिस्तानातल्या सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरु केलं आहे. अशातच आता पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्य करुन पाकिस्तानने स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारली. पाकिस्तानच्या सरकारी वकिलाने इस्लामाबाद हायकोर्टात धक्कादायक दावा केला, ज्यामुळे पाकिस्तानातील नागरिक संतप्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीर  ही परकीय भूमी असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे. कोर्टात पाकिस्तानने पीओकेचा भाग नसल्याचे मान्य केल्याने आता सगळीकडे याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयासमोर सांगितले की पाकव्याप्त काश्मीर ही परकीय भूमी आहे आणि त्यावर पाकिस्तानचा अधिकार नाही. या विधानाने पाकिस्तानातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काश्मिरी कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांच्या अपहरण प्रकरणात पाकिस्तानच्या सरकारी वकिलाने शुक्रवारी इस्लामाबाद हायकोर्टात ही कबुली दिली. इस्लामाबाद कोर्टात अहमद फरहाद शाह यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होती ज्यांचे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी १५ मे रोजी फरहाद यांचे रावळपिंडी येथील घरातून अपहरण केले होते. 

कोर्टाने काश्मिरी कवी अहमद फरहाद यांचा शोध घेण्याशी संबंधित खटला रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आणि अधिकाऱ्यांना त्यांना हजर करण्याचे निर्देश दिले होते. पत्नी उरुज झैनब यांनी अहमद फरहाद यांचा शोध घेण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याआधी बुधवारी ॲटर्नी जनरल मन्सूर उस्मान अवान यांनी सांगितले की, कवी अहमद फरहाद यांना अटक करण्यात आली आणि ते पाकव्याप्त काश्मीर पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यानंतर  शुक्रवारी पुन्हा पाकिस्तानचे अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांनी न्यायमूर्ती कयानी यांच्यासमोर सांगितले की, फरहाद शाह पाकव्याप्त काश्मीरमध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांना इस्लामाबाद हायकोर्टात हजर करता येणार नाही.

"पाकव्याप्त काश्मीर ही एक परकीय भूमी आहे ज्याची स्वतःची घटना आणि स्वतःची न्यायालये आहेत. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी न्यायालयांचे निर्णय परदेशी न्यायालयांच्या निर्णयांसारखे आहेत," असं विधान अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांनी केलं. यावर न्यायमूर्ती कयानी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा परकीय प्रदेश असेल तर पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी रेंजर्स तिथे कसे घुसले? असा सवाल केला.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीर हा स्वतंत्र देश असल्याचे पाकिस्तानने म्हटलेले नाही. उलट त्यांनी पाकव्याप्त काश्मीर हा परकीय प्रदेश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, काश्मीर हा स्वतंत्र नसून इतर देशाचा भाग आहे, असा त्यांचे म्हणणं आहे. मात्र अप्रत्यक्षपणे का होईना, पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केल्याचे म्हटलं जात आहे.

टॅग्स :POK - pak occupied kashmirपीओकेPakistanपाकिस्तानIndiaभारत