शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan News: इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी; जामीन देणाऱ्या न्यायाधीशाच्या हकालपट्टीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:32 IST

पाकिस्तानात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.

Pakistan News: भारताच्या शेजारील देश पाकिस्तानात परिस्थिती बिकट झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेविरोधात देशभरात आंदोलने होत आहेत. अनेक सरकारी संस्थांवर इम्रान समर्थकांकडून हल्ले होत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून इम्रान यांना जामीन मिळाल्यानंतर इम्रानविरोधी राजकीय पक्ष एकवटले आहेत. इम्रानच्या सुटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करत असून, संसदेतही इम्रान खान यांना फाशी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाझ अहमद खान यांनी इम्रान खान यांना जाहीरपणे फाशी देण्याची मागणी केली आहे. इम्रानच्या सुटकेच्या विरोधात पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट सर्वोच्च न्यायालयासमोर निदर्शने करत आहे. PDM ही सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज, जमियत उलेमा-ए-इस्लाम-फझल (JUIF) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यासह अनेक पक्षांची युती आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सध्या लाहोरमध्ये पुढील सात दिवस कलम 144 लागू करण्यात आले आहे.

सरन्यायाधीशांना हटवण्याची तयारी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान खान यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे इम्रान खान यांना जामीन मिळाला. यानंतर पाकिस्तान सरकार उघडपणे बंदियालच्या विरोधात आले आहे. सरकारने त्यांच्या विरोधात निषेधाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नॅशनल असेंब्लीने एक ठराव संमत केला आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी पाच सदस्यीय समितीची मागणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानInternationalआंतरराष्ट्रीय