शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan PM Shahbaz Sharif On China : "चीन सुख-दुःखाचा साथीदार, मैत्री अबाधित राहणार"; सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान ड्रॅगनसमोर गुडघ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 19:46 IST

Pakistan PM Shahbaz Sharif On China : सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचं गुणगान गाण्यास सुरूवात केली आहे. आमची मैत्री कायम राहील, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

Pakistan PM Shahbaz Sharif On China : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा अखेर अंत झाला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची वर्णी लागली. इम्रान खान यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करता आला नाही. पंतप्रधान बनण्यापूर्वीच शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य करण्यास सुरूवात केली होती. तसंच आता सत्ता हाती येताच त्यांनी चीनच्या पुढे गुडघेच टेकले. चीन हा आपला सुख-दु:खातील साथीदार असून आमची मैत्री अबाधित राहील, असं वक्तव्य त्यांनी केलं.

"चीन हा पाकिस्तानचा विश्वासू आणि सुख-दु:खातील साथीदार आहे. चीनने पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही आम्हाला साथ दिली. चीनने पाकिस्तानला नेहमीच आपला मित्र मानलं आहे. ही मैत्री राज्यकर्त्यांची मैत्री नसून जनतेची मैत्री आहे," असं मत शरीफ यांनी व्यक्त केलं.

"कोणी काहीही केलं तरी आमची मैत्री तुटणार नाही. यापूर्वीच्या सरकारनं ही मैत्री कमकुवत करण्यासाठी जे काही केलं ते त्रासदायक आहे. पाकिस्तान आणि चीनची मैत्री अबाधित आहे. आम्ही CPEC वर आणखी तेजीनं काम करू. आम्ही क्षी जिनपिंग सरकारचे आभारी आहोत," असंही ते म्हणाले.

चीनचेही बदलले सूरपाकिस्तानात सत्ताबदल होताच चीनचेही सूर बदलल्याचं दिसून आलं. पाकिस्तानात नवं सरकार स्थापन झाल्यावर आपले पाकिस्तानशी संबंध अधिक दृढ होती, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय. ग्लोबल टाईम्सनं शरीफ यांचं कौतुक करत ते अशा कुटुंबातील आहेत, ज्यांनी कायमच चीन आणि पाकिस्तानच्या मजबूत संबंधांसाठी समर्थन केलं. आता इम्रान खान यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक मजबूत संबंध होतील असंही ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग