शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
4
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
5
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
6
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
7
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
8
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
9
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
10
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
11
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
12
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
13
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
14
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
15
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
16
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
17
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
18
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
19
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
20
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 22:53 IST

"भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा."

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधत कठो पावले उचलायला सुरवात केली आहे. यानंतर, पाकिस्तानने याला आव्हान दिले आहे. जर भारताकडे या दहशतवादी हल्ल्याचे काही पुरावे असतील, तर ते त्यांनी सादर करावेत, असे पाकिस्तानचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर ते गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) पत्रकार परिषदेत बोलत होते. डार म्हणाले, "भारत नेहमीप्रमाणेच आरोप करत आहे आणि यावेळीही तसाच खेळ खेळला आहे. जर त्यांच्याकडे पाकिस्तानच्या सहभागाचा काही पुरावा असेल तर तो त्यांनी आपल्यासमोर आणि जगासमोर सादर करावा." यावेळी, परराष्ट्र मंत्री डार यांनी एनएससीच्या निर्णयांचा उल्लेख करत, पाकिस्तानने भारताला त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले असल्याचेही म्हटले आहे. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, कायदा मंत्री आझम नजीर तरार, माहिती मंत्री अताउल्लाह तरार आणि पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल (एजीपी) मन्सूर अवान हे देखील उपस्थित होते.

कसल्याही आव्हानासाठी पाकिस्तान तयार -डार पुढे म्हणाले, "आपल्याला माहीत आहे की, भारतीय गुप्तचर संस्था त्यांचे समर्थन करत आहेत आणि परदेशी लोक आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइस) निर्यात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण कल्पना करू शकता की ते, ते कुठे निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतील. मात्र, पाकिस्तानचे सशस्त्र दल कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहे. 

यावेळी, संरक्षणमंत्री आसिफ म्हणाले, जरी भारताने या घटनेसाठी थेट पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, मीडिया आणि इतर देश पाकिस्तानला दोषी ठरवत आहेत. जर भारताने अधिकृतपणे पाकिस्तानचे नाव घेतले, तर त्याला त्याचेही उत्तर मिळेल. पाकिस्तानला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. एवढेच नाही तर, "नरेंद्र मोदी हे जगातील एकमेव नेते आहेत, ज्यांना अमेरिकेने दहशतवादाच्या आधारावर व्हिसा देण्यास नकार दिला होता," असेही आसिफ म्हणाले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद