शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi Birthday : इम्रान खान यांच्या मंत्र्याची मोदींवर पातळी सोडून टीका; पाकिस्तानी जनतेकडून धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:23 IST

PM Modi Birthday : विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्याची पाकिस्तानी जनतेकडून धुलाई

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानं पाकिस्तानी नेत्यांचा जळफळाट झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दररोज भारतविरोधी विधानं केली जात आहेत. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पातळी सोडून टीका केली आहे. मात्र मोदींवर निशाणा साधणारे हुसेन पाकिस्तानातच ट्रोल झाले. अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या विधानाचा निषेध केला.  आज पंतप्रधान मोदींचा ६९ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांच्या प्रमुखांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन पातळी सोडून मोदींची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. 'आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचं महत्त्व सांगतो,' असं ट्विट हुसेन यांनी केलं. यापुढे त्यांनी #मोदीबर्थडे असंदेखील लिहिलं आहे. हुसेन यांच्या ट्विटवर जोरदार टीका होत आहे. अनेकांनी यावरुन मीम्स तयार करत हुसेन यांना लक्ष्य केलं आहे. हुसेन यांनी केलेली टीका पाकिस्तानमधील सुशिक्षित वर्गाला आवडलेली नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील प्राध्यापिका आएशा अहमद यांनी हुसेन आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा खरपूस समाचार घेतला आहे. 'पाकिस्तान सरकारचे एक प्रतिनिधी एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानांबद्दल कशी भाषा वापरत आहेत? इतकंच शत्रूत्व दाखवायचं असेल, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, लोकशाहीच्या मार्गानं स्पर्धा करा. पातळी सोडून टीका करुन जिंकणं गौरवास्पद नसतं मंत्रिमहोदय,' अशा शब्दांमध्ये अहमद यांनी हुसेन यांना सुनावलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान