शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

पाकच्या मंत्र्याला लसूण आणि आले यातला फरकही माहीत नाही; पाहा व्हिडिओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:58 IST

Pakistan Minister Fawad Chaudhry : पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्या या ज्ञानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या सरकारमधील मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) हे आपल्या अनेक वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत आहेत. यातच आता ज्ञानाच्या बाबतीतही त्यांची झोळी रिकामी असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. फवाद चौधरी हे महागाईच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत होते आणि यावेळी त्यांनी आपल्या ज्ञानाचे जे काही प्रदर्शन केले, ते पाहून पाकिस्तानमधील नागरिकांनाही हसू आवरले नाही. या मंत्री महोदयांनी लसूणला ( Garlic) आले (Ginjer) म्हणून सांगितले आणि पत्रकार परिषदेत शेवटपर्यंत त्यावर ते राहिले.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्या या ज्ञानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फवाद चौधरी हे महागाईच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दर कमी झाल्याबद्दल ते म्हणतात, 'लसूण म्हणजे आले'. अनेकांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला, मात्र मंत्री आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. लसूण म्हणजे फक्त आले याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

'ते पाकिस्तानचे आइन्स्टाईन आहेत'लसूणला हिंदीत 'लहसुन' तर आल्याला अदरक म्हणतात. काही लोकांनी फवाद चौधरीच्या वक्तव्याचा बचाव करत म्हटले की, लसूण आणि आले याबाबत हिंदी भाषेत चुका होतात. तर एका यूजरने लिहिले की, 'ते पाकिस्तानचे आइन्स्टाईन आहेत'. तसेच, कंगना राणौतच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटातील एक संवाद अनेक यूजर्सनी शेअर केला आहे, ज्यामध्ये कंगना म्हणते, 'हालत देखी है, अदरक हो गया है यह आदमी. कहीं से भी बढ़ा जा रहा है.'

दरम्यान, अलीकडेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून खुद्द फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या शाळा-कॉलेजवर निशाणा साधला होता. देशातील धर्मांधतेला मदरसे जबाबदार नसून 1980 आणि 1990 च्या दशकात याच हेतूने नियुक्त करण्यात आलेले शाळा-महाविद्यालयातील शिक्षक आहेत, असे ते म्हणाले होते. तसेच, पाकिस्तानला आजचा सर्वात मोठा धोका कोणत्याही परकीय शक्तीकडून नसून स्वतःपासून आहे, असेही फवाद चौधरी यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliticsराजकारण