शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धक्कादायक! महिला इन्स्पेक्टरचं संतापजनक कृत्य, कैदेतील महिलेला निर्वस्त्र केलं अन् सर्वांसमोर नावचवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 15:48 IST

Pakistan : ही घटना बलूचिस्तान प्रांतातील आहे. इन्स्पेक्टर शहाना इरशादला पोलीस चौकशी समितीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यात दोषी ठरवलं.

पाकिस्तानातून (Pakistan Crime News) सतत काहीना काही विचित्र आणि धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिला पोलिसाने फारच संतापजनक कृत्य केलं आहे. त्यानंतर तिला नोकरीवरून काढण्यात आलं. महिला पोलिसाने कैदेत असलेल्या महिलेला आपले कपडे काढण्यास भाग पाडलं आणि तिला तुरूंगात डान्स करण्यासही सांगितलं. ही घटना बलूचिस्तान प्रांतातील आहे. इन्स्पेक्टर शहाना इरशादला पोलीस चौकशी समितीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यात दोषी ठरवलं.

समितीने सांगितलं की, शबानाने पोलीस रिमांड दरम्यान तुरूंगात कैद महिलेसोबत अमानविय कृत्य केलं. पोलीस अधिकारी मुहम्मद अजहर अकरम म्हणाले की, 'चौकशीतून आढळून आलं की, महिला इन्स्पेक्टर परी  गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली होती. तिला एका मुलीच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. तेव्हा महिला पोलीस रिमांडवर होती. त्यावेळी महिला इन्स्पेक्टर शबानाने कैद महिलेला निर्वस्त्र केलं, आणि इतर कैद्यांसमोर नाचायलाही लावलं. 

कोर्टाने पीडित महिलेला कस्टडीत पाठवलं आहे. अकरम म्हणाले की, 'महिला इन्स्पेक्टरला आपला बचावात सांगण्यासाठी काहीच नव्हतं. त्यामुळे तिला नोकरीहून काढण्यात आलं'. ते म्हणाले की, 'जेव्हा एक महिला इन्स्पेक्टर एखाद्या दुसऱ्या महिलेसोबत असं  करते, आणि आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करते. तेव्हा हे सहन केलं जाऊ शकत नाही'.

दरम्यान, पाकिस्तानात महिलांविरोधात गुन्हे वेगाने वाढत आहेत. परिस्थितीत इतकी वाईट झाली आहे की,  महिला आता तुरूंगातही सुरक्षित नाहीत. इथे महिलांच्या हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यावरून देशात मोठं विरोध प्रदर्शन करण्यात आलं. सरकारकडे महिलांची सुरक्षा वाढण्यासाठी मागणी केली गेली. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारी