शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Karachi Blast : कराचीत मोठा स्फोट, 11 जण ठार; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 17:33 IST

घटनास्थळी ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्सदेखील तपास करण्यात व्यस्त आहेत.

इस्लामाबाद - पाकिस्तानातील कराची येथे शनिवारी दुपारी भाषण स्फोट झाला (Karachi blast). यात स्फोटात किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कराचीच्या शेरशाह भागातील (shershah Area) परचा चौकाजवळ हा स्फोट झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. स्फोटात जखमी झालेल्या 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी जफर अली शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका खाजगी बँकेच्या खाली असलेल्या नाल्यात झाला. 

बँकेच्या इमारतीचे आणि पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान -पोलिसांनी दावा केला आहे, की स्थानिक प्रशासनाने नाला साफ करण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, परिसर खाली न झाल्याने याला विलंब झाला. या स्फोटात बँकेच्या इमारतीचे आणि जवळच असलेल्या पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीखालील नाल्यात गॅस जमा झाल्याने हा स्फोट झाल्याची शंका पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बॉम्ब डिस्पोजल स्क्वॅडही घठनास्थळी -पोलीस प्रवक्त्याने नंतर सांगितले की, बॉम्ब डिस्पोजल पथकालाही घठनास्थळी तपासासाठी पाचारण करण्यात आले. या पथकाने अहवाल दिल्यानंतरच स्फोटाचे निश्चित कारण सांगता येईल. सिंध रेंजर्सनी एका निवेदनात म्हटले आहे की, स्फोटाची माहिती मिळताच, अधिकाऱ्यांनी स्फोटाच्या ठिकाणी धाव घेतली आणि परिसराची घेराबंदी केली. 

याशिवाय, घटनास्थळी ढिगाऱ्या खाली अनेक जण अडकल्याचे वृत्त आहे. हा ढिगारा हटविण्यासाठी स्थानिक लोकही सहकार्य करत आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस दल आणि सिंध रेंजर्सदेखील तपास करण्यात व्यस्त आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोटbankबँक