शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:56 IST

Pakistan News: अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या एका अहवालामधून पाकिस्तानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान अमेरिकेपर्यंत मारा करू शकेल असं अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याचा दावा या अहवालामधून करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या एका अहवालामधून पाकिस्तानबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान अमेरिकेपर्यंत मारा करू शकेल असं अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तयार करत असल्याचा दावा या अहवालामधून करण्यात आला आहे. ही माहिती अमेरिकेमधील फॉरेन अफेअर्स या प्रतिष्ठित नियतकालिकामधून प्रसिद्ध झाला आहे. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चीनच्या पाठिंब्याने आपल्याकडील अण्वस्त्रांचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जर पाकिस्तान असं क्षेपणास्त्र तयार करणार असेल तर आमेरिकेला नाईलाजास्तव पाकिस्तानला आण्विक शत्रू म्हणून घोषित करावं लागेल. अण्वस्त्रे असलेला कुठलाही देश जाच्यापासून अमेरिकेला धोका उदभवू शकतो, अशा देशाला अमेरिकेकडून आण्विक शत्रू म्हणून घोषित केलं जातं. सद्यस्थितीत रशिया, चीन आणि उत्तर कोरियाला अमेरिकेचे आण्विक शत्रू मानले जाते.

या रिपोर्टमध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, जर पाकिस्तानने असं क्षेपणास्त्र तयार केलं तर अमेरिकेकडे त्याला आण्विक शत्रू घोषित करण्याशिवाय कुठलाही पर्याय नसेल. अमेरिकेपर्यंत मारा करू शकेल, असं आंतरखंडीय क्षेपणास्त्र जवळ बाळगणारा कुठलाही देश हा अमेरिकेचा मित्र असू शकत नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिका