शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Pakistan Inflation :पाकिस्तानात आजपासून पेट्रोल 272 तर डिझेल 280 रुपए लिटर; नागरिक त्रस्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:47 IST

गेल्या महिनाभरात पेट्रोल 58 रुपयांनी तर डिझेल 53 रुपयांनी महागले.

Pakistan Inflation : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असून, पेट्रोल-डिझेलच्या दरांनीही विक्रमी पातळी गाठली आहे. सरकारने गुरुवारपासून पेट्रोल 22 रुपयांनी तर डिझेल 17 रुपयांनी वाढवले. त्यामुळे आजपासून पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 272 तर एक लिटर डिझेलची किंमत 280 रुपये झाली आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल 58 रुपयांनी तर डिझेल 53 रुपयांनी महागले. 16 जानेवारीला पेट्रोलचा दर 214.80 रुपये तर डिझेलचा दर 227.80 रुपये होता.

पाकिस्तानच्या वित्त विभागाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीचे श्रेय पाकिस्तानी चलन (रुपया) च्या घसरणीला दिले आहे. जिओ न्यूजनुसार, सध्या पाकिस्तानमध्ये परकीय चलनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे आयात-निर्यातीवर परिणाम होत आहे. महागाई वाढत आहे. IMFने कर्ज देण्यास नकार दिला आहे. आयएमएफने कर्जासाठी कठोर अटी ठेवल्या आहेत, यामध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीचा समावेश आहे.

सरकारने आणला मिनी बजेट पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने गेल्या आठवड्यात घोषणा केली की सरकार आयएमएफ बेलआउट पॅकेज अनलॉक करण्यासाठी चार महिन्यांत 170 अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्यासाठी एक मिनी-बजेट सादर करेल. यामुळे 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आला. याअंतर्गत अनेक प्रकारच्या करांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्याचा संपूर्ण भार महागाई आणि उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या पाकिस्तानातील जनतेला उचलावा लागणार आहे.

जूनपर्यंत महागाई 33 टक्के राहीलपाकिस्तानमध्ये केवळ पेट्रोलच नाही तर दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या रॉकेल, लाईट डिझेल आणि हायस्पीड डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील महागाई आणखी वाढणार आहे. मूडीज अॅनालिटिक्स सिनियर इकॉनॉमिस्ट कतरिना एल यांच्या मते, यामुळे 2023 च्या पहिल्या सहामाहीत (जूनपर्यंत) पाकिस्तानमधील चलनवाढीचा दर 33% पर्यंत वाढेल. देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आयएमएफचे कर्जही पुरेसे ठरणार नाही, असेही ते म्हणाले.

आयएमएफची टीम कर्ज मंजूर न करताच परतली आयएमएफची टीम 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत पाकिस्तानात होती. यादरम्यान सुमारे 10 दिवस कर्जाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तान बेलआउट पॅकेजबाबत आयएमएफशी कोणताही करार अंतिम करू झाला नाही. आयएमएफचे अधिकारी नॅथन पोर्टर म्हणाले की, आगामी काळातही या विषयावर पाकिस्तानशी आभासी चर्चा सुरूच राहणार आहे. आतापर्यंत कोणत्याही करारावर स्वाक्षरी झालेली नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInflationमहागाईInternationalआंतरराष्ट्रीयPetrolपेट्रोलDieselडिझेल