शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान सरकार पीटीआय नेत्यांवर अत्याचार करतंय, इम्रान खान यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 22:41 IST

सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.

लाहोर : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय)  दोन प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यानंतर दबावामुळे पीटीआय नेते आपला पक्ष सोडत आहेत, असा आरोप पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान यांनी बुधवारी केला. यासोबतच एक दिवस काळाचे चाके फिरणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आणि सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तरी ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच जिंकतील, असा दावा इम्रान खान यांनी केला.

इम्रान खान यांनी बुधवारी संध्याकाळी देशाला उद्देशून व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात ते म्हणाले, "सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी माझ्या घरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मी तुमच्या लोकांशी चर्चा राहण्याचा प्रयत्न करत राहीन." 9 मे रोजी इम्रान खानच्या अटकेनंतर देशव्यापी हिंसाचारानंतर पीटीआय नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याचा संदर्भ देत पीटीआय पक्षप्रमुख इम्रान खान म्हणाले, "ही अशी कारवाई आहे जी पाकिस्तानमध्ये यापूर्वी कधीही घडली नव्हती. आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे." 

यासोबतच तुम्ही पीटीआयमध्ये असेपर्यंत तुमच्यावर कारवाई केली जाईल असे या नेत्यांना सांगण्यात येत आहे. पीटीआय सोडल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असा आरोप इम्रान खान यांनी सरकारवर केला. याचबरोबर, इम्रान खान यांनी पीटीआय नेत्यांवर केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, "गुन्हेगारीने कधी आयडिया मारली जाऊ शकते का? संपूर्ण एजन्सी त्यांना मदत करत आहे, तरीही ते निवडणुकीपासून का पळत आहेत.'' तसेच, त्यांनी दावा केला की,  "राजकीय पक्षांची तेव्हाच संपते, जेव्हा त्यांची व्होट बँक संपते. जनतेने आपला निर्णय घेतला आहे. सर्व नेत्यांनी पक्ष सोडला तर ज्यांना आम्ही तिकीट देऊ तेच विजयी होतील."

"पीटीआय नेत्यांनी अंडरग्राऊंड राहावे"इम्रान खान म्हणाले, "मी माझ्या सर्व लोकांना, कार्यालयातील कर्मचारी, पक्षाचे अधिकारी आणि अडचणीत असलेल्या सर्वांना अंडरग्राऊंड राहण्यास सांगितले आहे. जर यामुळे तुम्हाला मदत मिळत असेल तर, स्वतःला हायलाइट करू नका." याशिवाय, पीटीआय नेत्यांवरील आरोपांचा बचाव करताना इम्रान खान म्हणाले, "शिरीन मजारी या सर्वात देशभक्त पाकिस्तानी आहेत. त्या जीव देतील, पण देशाविरुद्ध काहीही करणार नाहीत. इम्रान रयाझ यांना कोर्टात हजर करण्यावरून त्यांच्यावर इतका अत्याचार केल्याचे कोर्ट वारंवार सांगत आहे, की त्यांना आजतागायत कोर्टात हजर केले गेले नाही." 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान