शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video : पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेत इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्यांनी उपसभापतींना कानशिलात लगावल्या, केसही ओढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:42 IST

पाकिस्तानच्या पंजाब विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआयच्या नेत्यांनी वेलमध्ये येत उपसभापतींवर हल्ला चढवत कानशिलात लगावल्या. तसंच चपलेनंही मारलं.

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब विधानसभेत (Punjab Assembly) शनिवारी इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्ष पीटीआयच्या (PTI) नेत्यांनी मर्यादा ओलांडली. विधानसभेचे अधिवेशन सुरू होताच पीटीआय नेत्यांनी वेलवर मध्ये येत हल्लाबोल केला आणि उपसभापती मोहम्मद माजरी यांना चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर पीटीआयचे नेते सोबत लोटा घेऊन आले होते. त्यांनी आधी लोटा फेकून हल्ला केला आणि यानंही त्यांचं मन समाधान झालं नाही, त्यांनी उपसभापतींचे केस ओढून त्यांना कानशिलातही लगावल्या.

दरम्यान, लाहोर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पंजाबसाठी नवा मुख्यमंत्री निवडला जाणार आहे. त्यासाठी शनिवारी अधिवेशन बोलावण्यात आले होते. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदासाठीचा हमला शाहबाज आणि चौधरी परवेझ इलाही यांच्यात स्पर्धा आहे. या अधिवेशनाची अध्यक्षता उपसभापती मोहम्मद मजरी करत होते. हमजा हे पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज आणि अन्य पक्षांचे उमेदवार आहेत. तर पीएमएल-क्यू आणि पीटीआय पक्ष इलाही यांना समर्थन देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिवेशन सुरू होताच आधीपासूनच तयार बसलेल्या पीटीआयच्या नेत्यांनी विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नॅशनल असेंब्लीतील अविश्वास ठरावासाठी पीटीआयमधून बाहेर पडून विरोधी पक्षात गेलेल्या नेत्यांवर हल्लाबोल करत पीटीआयच्या नेत्यांनी गदारोळ सुरू केला. उपसभापतींनी पीटीआय नेत्यांना तसे करण्यापासून रोखले असता त्यांनी उपसभापती मजरी यांच्यावर लोटा फेकण्यास सुरुवात केली. यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी वेलमध्ये येऊन उपसभापतींना मारहाण करण्यास सुरुवात केली.

उपसभापतींना मारहाणपाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार पीटीआय नेत्यांनी मजरी यांच्या कानशिलातही लगावल्या. तसंच त्यांचे केसही खेचले. यादरम्यान, विधानसभेत साध्या कपड्यात तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत मजरी यांना बाहेर काढलं. यानंतर कामकाज स्थगित करण्यात आलं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान