शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Political Crisis: '68 लाखांची बॅग अन् 600 कोटींचा घोटाळा', कोण आहे इम्रान खान यांच्या जवळची 'ती' महिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 18:15 IST

Pakistan Political Crisis: पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. आधी इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे, त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयावर मोठा आरोप लावला जात आहे.

इस्लामाबाद:पाकिस्तानमध्ये मोठा राजकीय गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. त्यानंतर आता त्यांची निकटवर्ती असलेल्या फराह खानवर कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत. तसेच, पैसे घेऊन ती पाकिस्तानातून पळून गेल्याचा दावाही केला जात आहे. ती खासगी विमानाने पळून जात असल्याचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

68 लाखांची बॅग घेऊन पसार?फराह खान पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांची अत्यंत जवळची मैत्रीण आहे. सत्तेच्या अतिशय जवळ असल्याने फराहवर 600 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. यातच ती पाकिस्तानातून काही पैसे घेऊन पळून गेल्याचा दावा केला जात आहे. तिचा एका लक्झरी विमानात बसल्याचा फोटोही व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्याजवळ एक मौल्यवान बॅग दिसत आहे, ज्याची किंमत सुमारे 68 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या रिपोर्टनुसार, फराह खान रविवारीच दुबईला पळून गेली आहे. तिचा नवरा आधीच परदेशात निघून गेल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यामध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या विरोधी पक्षाच्या नेत्या रोमिना खुर्शीद यांनी फराहचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कधी काढण्यात आला, हे स्पष्ट झाले नसले तरी. फोटोमध्ये फराहच्या शेजारी एक बॅग दिसत आहे. याबद्दल रोमिना खुर्शीद यांनी लिहिले- 'बुशराची जवळची मैत्रीण फराह खान देशातून पळून गेली आहे. तिच्याजवळ सुमारे 68 लाखांची बॅग आहे.'

फराहवर काय आरोप आहे?पीएमएल-एन पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी फराहवर अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप केला होता. मरियमने फराहवर 600 कोटींची हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आज इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत फराह खानबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर ते पत्रकारांवर चांगलेच भडकेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पत्रकारांना भाडोत्री असा उल्लेख केला. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान