शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:21 IST

Pakistan IMF Loan: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा IMF कडे कर्जाची मागणी केली आहे.

Pakistan IMF Loan: गरीबी, उपासमारी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) समोर कर्जासाठी हात पसरले आहेत. पाकिस्तानला कर्ज द्यायचे की नाही, हे ठरवण्यासाठी IMF चे पथक पाकिस्तानमध्ये दोन आठवडे थांबेल आणि पाकच्या आर्थिक सुधारणेचे अवलोकन करेल. पथकाला सुधारणा दिसल्या, तरच IMF पाकिस्तानला नवीन कर्ज दिले जाईल.

पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉनच्या वृत्तानुसार, IMF ने मंगळवारी (३० सप्टेंबर २०२५) पाकिस्तानला ७ अब्ज डॉलर्सचे कर्ज आणि १.१ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त रक्कम देण्यासंदर्भात पाकिस्तानच्या आर्थिक पथकासोबत औपचारिक बैठक घेतली. या बैठकीत IMF मिशनच्या प्रमुख ईवा पेत्रोव्हा आणि पाकिस्तानचे वित्तमंत्री मोहम्मद औरंगजेब याच्यासह स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर, वित्त सचिव आणि संघीय महसूल मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. 

रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने IMF मिशनला सांगितले की, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा विचार केला जावा. मात्र, सध्याची समीक्षा बैठक पुराच्या आधीच्या लक्ष्यांवर आधारित आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार जून २०२५ पर्यंतच्या कामगिरीसाठी जबाबदार राहणार आहे. IMF ने आधी दिलेली लक्ष्ये पूर्ण केली असतील, तरच पाकिस्तानला कर्जाची पुढील रक्कम दिली जाईल. ही बैठक सकारात्मक ठरली, तर पाकिस्तान पुढील महिन्यात सुमारे १ अब्ज डॉलरच्या वितरणासाठी पात्र होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan seeks IMF loan again amid economic crisis: 'Bhikharistan'

Web Summary : Facing economic hardship, Pakistan pleads with IMF for loans. An IMF team assesses Pakistan's economic reforms for loan approval. Prior goals must be met.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयAmericaअमेरिका