शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान हा अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:25 IST

भारताने दस्तावेजाचे काढले वाभाडे

संयुक्त राष्ट्र :  पाकिस्तान संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांचा आश्रयदाता आहे. अबोटाबादेत अनेक वर्षे अल-कायदाचा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडी मारून बसला होता, नंतर तो मारला गेला, याची आठवणही भारतानेपाकिस्तानला करून  दिली.संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टॉनिओ गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या दूताने सादर केलेल्या माहितीदाखल दस्तावेजावरून भारताने पाकिस्तानचे वाभाडे काढले.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी मंगळवारी केलेल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानने सादर केलेले दस्तावेज विश्वासार्ह नाहीत, खोटेनाटे दस्तावेज गोळा करून खोटे कथानक रचण्याचे पाकिस्तानचे खटाटोप काही नवीन नाहीत. संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या अनेक दहशतवाद्यांचा पाकिस्तान आश्रयदाता आहे. पाकिस्तानने अबोटाबाद आठवावे. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजनैतिक प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी गुटेरस यांची भेट घेऊन पाकिस्तान सरकारच्या वतीने एक दस्तावेज सादर केला होता. भारत पाकिस्तानात दहशवादाला उत्तेजन देत आहे, असा आरोप यात करण्यात आला होता.  यावर परखड प्रतिक्रिया देत तिरुमूर्ती यांनी पाकिस्तानला अबोटाबादची आठवण करून दिली. अबोटाबादेत ओसामा बिन लादेन अनेक वर्षे दडी मारून बसला होता. 

मे २०११ मध्ये अमेरिकी नौदलाच्या सील कमांडोजनी त्याला ठार केले होते.पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये  सुरक्षा दलावर हल्ला करण्याच्या कटाबाबत  सोमवारी भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जपानच्या दूतांना माहिती दिली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत