शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
2
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
3
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
4
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
5
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
6
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
7
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
8
Gas Cylinder booking WhatsApp: व्हॉट्सअपवरून एलपीजी सिलेंडर बुक कसा करायचा, समजून घ्या प्रक्रिया
9
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...
10
एकाच कुटुंबातील १० जणांची आत्महत्या! २१ दिवसांपूर्वी काका, ४ महिन्यांपूर्वी बहिणी अन् आता...
11
"देवा! कसली परीक्षा घेतोयस...", एकापाठोपाठ एक ३ मुलांचा मृत्यू, काळजात चर्र करणारी घटना
12
पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?
13
Itel City 100: ८ हजारांत १३ मेगापिक्सेल कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले, आयटेलने स्पर्धकांची चिंता वाढवली!
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण, दत्तगुरु प्रसन्न होतील; पुण्य-लाभ
15
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
16
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
17
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
18
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
19
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
20
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानने हाफिज सईदचा शस्त्रपरवाना केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 18:04 IST

पाकिस्तानने मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला देण्यात आलेल्या 44 शस्त्रांचा परवाना रद्द केला आहे

ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 21 - पाकिस्तानने मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला देण्यात आलेल्या 44 शस्त्रांचा परवाना रद्द केला आहे. हाफिज सईदसोबतच त्याच्या साथीदारांचाही शस्त्रपरवाना रद्द करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचललं गेलं असल्याचं सांगण्यात आलं आहे. पंजाब गृहमंत्रालयातील अधिका-याने सांगितल्यानुसार सरकारने हाफिज सईद आणि त्याच्या संस्था जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियतविरोधात उचलल्या पावलानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
(राष्ट्रहितासाठी हाफिज सईद नजरकैदत - पाकिस्तान)
(हाफिज सईद देशासाठी धोका, पाकिस्तानला अखेर जाग)
 
पाकिस्तान सरकारला अखेर जाग आली असून मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद देशासाठी धोका असल्याची जाणीव त्यांना झाली आहे. 'हाफिज सईद देशासाठी गंभीर धोका असून देशहितासाठीच त्याला अटक करण्यात आली आहे', असं वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. 
 
(आधी माझ्यावरची प्रवासबंदी उठवा, हाफिज सईदचा पाकिस्तान सरकारला आदेश)
(पाकच्या लेखीही हाफिज अतिरेकी)
(पाकच्या त्या कारवाईचे भारताकडून स्वागत)
 
२६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचे सज्जड पुरावे देऊनही इतकी वर्षे पाठीशी घातल्यानंतर जमात-उद-दवा (जेयूडी)चा प्रमुख हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानातही दहशतवादी ठरविण्यात आले आहे. अतिरेकी हल्ल्यांमध्ये स्वत:च्या शेकडो नागरिकांचे बळी जात असलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्याची जाणीव झाल्यानंतर ही उपरती झाली आहे.
 
पंजाब प्रांताच्या सरकारने हाफिज सईद आणि काझी काशिफ या त्याच्या निकटच्या सहकाऱ्याचे नाव दहशतवादविरोधी कायद्याच्या चौथ्या परिशिष्टात समाविष्ट केले आहे. फैसलाबाद येथील अब्दुल्ला ओबैद आणि ‘मर्काज-ई-तैयबाचे झफर इक्बाल व अब्दुल रहमान आबिद यांनाही पंजाबच्या प्रांतीक सरकारने या कायद्याच्या कक्षेत आणले आहे. दहशतवादविरोधी विभागाने सईदसह या पाच जणांवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशही पंजाब सरकारच्या गृह विभागाने दिले आहेत. या पाचही जणांना ३० जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शिवाय हाफिज सईदसह ‘जेयूडी’ आणि ‘फलाह-ई-इन्सानियत’शी संबंधित ३७ जणांना देश सोडून जाण्यास प्रतिबंधही करण्यात आला.
 
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने भारताच्या मागणीप्रमाण हाफिज सईदविरोधात कारवाईची पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हाफीजविरुद्धच्या कारवाई म्हणजे मुलकी सरकारच्या पाठीशी पाकचे लष्कर ठामपणे उभे आहे व पाकिस्तानचे सुरक्षाविषयक अग्रक्रम बदलत आहेत, याचे द्योतक मानले जात आहे. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही सईदला काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. परंतु वर्षभरातच न्यायालयाने त्याला मुक्त केले. सईदचे दहशवादाशी असलेले संबंध मान्य करून अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस जाहीर केले आहे.
 
 हाफिज सईदने पाकिस्तान सरकारला आपल्यावर देशाबाहेर प्रवास न करण्यासाठी घालण्यात आलेली बंदी उठवत, यादीतून आपलं नाव काढून टाकण्याचा आदेशच देऊन टाकला आहे. आपल्यामुळे सुरक्षेला कोणताही धोका नसून, आपली संस्था कोणत्याही दहशतवादी घडामोडींमध्ये सहभागी नसल्याचा दावा करत हाफिज सईदने ही मागणी केली. 
 
 पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांना हाफिज सईदने यासंबंधी पत्र पाठवलं आहे. पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात हाफिज सईदसह 37 जणांवर प्रवासबंदी लावली असून या सर्वाना देशाबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये हाफिज सईदच्या फलाह-ए-इन्सानियत संस्थेचाही समावेश आहे. यासोबतच सईदसह इतर चार जणांना शांतता आणि सुरक्षेला धोका पोहोचवणा-या कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल 90 दिवसांच्या घरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
 हाफिज सईदने मात्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आपली संस्था कोणत्याच दहशतवादी कारवायांमध्ये कधी सहभागी झाली नसल्याचा दावा केला आहे. 'माझ्या संस्थेविरोधात दहशतवाद किंवा संपत्तीचं नुकसान केल्याचं कोणतंच प्रकरण अद्याप समोर आलेलं नाही', असं हाफिजचं म्हणणं आहे. 'आपल्याविरोधात एकही पुरावा कोणी सादर करु शकलेलं नाही असा दावा करत आपल्यावर लावण्यात आलेली बंदी उठवा', अशी मागणी हाफिजने केली आहे.