शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:08 IST

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

इस्लामाबाद : इम्रान खान सरकार गेले आणि पाकिस्तानी नागरिक आणखी संकटात सापडले आहेत. शाहबाज शरीफ सरकार सत्तेत आल्या आल्याच त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर प्रति लीटर ३० रुपयांनी वाढवले होते. आता पुन्हा एकाच दिवसात २४ रुपयांनी दर वाढले आहेत. 

पाकिस्तानात आता एक लीटर पेट्रोलची किंमत 233.89 रुपयांवर गेली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 16.31 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तिथे एक लीटर डिझेलचा दर 263.31 रुपये झाला आहे. पाकिस्तान सरकारने बुधवारी या दरवाढीची घोषणा केली. पाकिस्तानमध्ये गेल्या २० दिवसांत तिसऱ्यांदा अशाप्रकारे दर वाढले आहेत. हे नवे १५ जूनच्या रात्रीपासून लागू झाल्याची घोषणा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी केली. 

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.  पाकिस्तानी सरकार आणि आंतरराष्ट्रीय नाणे निधी यांच्यातील कतारमधील चर्चा निष्फळ राहिली आहे. गेल्याच महिन्यात पेट्रोल, डिझेलवरील सबसिडी बंद करा, मग पैसे देण्याबाबत पुढे बोलू असे आयएमएफने पाकिस्तानला सुनावले होते. परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर पुरवठादार देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत आहेत. 

रॉकेलची किंमत 29.49 रुपयांनी वाढून 211.43 रुपये झाली आहे. लाइट डिझेल 29.16 रुपयांच्या वाढीनंतर 207.47 रुपये होईल. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी सांगितले की, आजही पेट्रोलमध्ये 24.03 रुपये, डिझेलमध्ये 59.16 रुपये, रॉकेलमध्ये 29.49 रुपये आणि लाईट डिझेलमागे 29.16 रुपयांचे नुकसान होत आहे. सरकार पेट्रोल सबसिडीवर 120 अब्ज रुपये खर्च करत आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोल