शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

"भारत चंद्रावर पोहोचला, पाकिस्तान अजूनही जमीनीवरच, याला जबाबदार.."; नवाझ शरीफांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 5:46 PM

नवाझ शरीफ चौथ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत

Nawaz Sharif Pakistan vs India: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सध्या भारताचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसात स्वत:चा देश पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही टीका केली आहे. 'जरा भारताकडे बघा, तो देश आज चंद्रावर पोहोचला आहे, त्यांची चंद्रयान-३ मोहिम यशस्वी झाली आहे. पण पाकिस्तान अजूनही जमिनीवरच येत आहे. या आर्थिक संकटाला सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे. नियोजन नीट असते तर आज पाकिस्तानही फार पुढे असता. नवाझ शरीफ नुकतेच असेही म्हणाले होते की, देशाच्या आर्थिक संकटाला भारत किंवा अमेरिका जबाबदार नाही. त्यानंतर आता त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

ब्रिटनमधून परतलेले नवाझ शरीफ सध्या पुन्हा एकदा आपले राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि त्याआधी ते सतत रॅलीच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या आर्थिक संकटासाठी पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान खान यांच्या सरकार जबाबदार आहे. आमचा शेजारी चंद्रावर पोहोचला आहे पण आम्ही अजूनही जमिनीवरच आहोत आणि हे सतत घडत आहे, असे ते म्हणाले.

आर्थिक संकटाला भारत जबाबदार नाही

पाकिस्तानच्या आजच्या आर्थिक संकटाला अमेरिका, भारत किंवा अफगाणिस्तान जबाबदार नाही, असे नवाझ शरीफ म्हणाले. नवाझ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. २०१८च्या निवडणुकीत फसवणूक करून इम्रान खान यांनी सत्ता बळकावली असा आरोप करत त्यांनी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले आहे.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानIndiaभारतChandrayaan-3चंद्रयान-3