शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

तोशाखाना प्रकरणी इम्रान खान दोषी; ३ वर्षांची शिक्षा, ५ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 14:33 IST

Imran Khan: तोशाखान प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर इम्रान खान यांना कधीही अटक केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Imran Khan: तोशाखान प्रकरणात इम्रान खान यांना दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबाद येथील एका ट्रायल कोर्टाने तोशाखान प्रकरणात दोषी ठरवत इम्रान खान यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ट्रायल कोर्टाने दिलेल्या ३ वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे आता इम्रान खान यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जमान पार्क रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

तोशाखाना प्रकरणात दिलासा देण्याची इम्रान खान यांची याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान यांनी तोशाखानात ठेवलेल्या भेटवस्तूंचा तपशील जाणूनबुजून लपवल्याचा आरोप आहे. आरोप सिद्ध झाल्यानंतर इस्लामाबाद ट्रायल कोर्टाने निकाल दिला.

कायद्याची खिल्ली उडवली जात आहे

कोर्टाच्या निर्णयानंतर इम्रान खानचा पक्ष पीटीआयने एक निवेदन जारी केले. हे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. सरकारला इम्रान खान यांना अपात्र ठरवून तुरुंगात टाकायचे आहे. कायद्याची खिल्ली उडवली जात आहे. तोशाखाना प्रकरणात कोर्टाचा निर्णय अत्यंत पक्षपाती आहे. नैतिकदृष्ट्या भ्रष्ट न्यायाधीशाच्या हातून न्यायाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घणाघाती टीका पीटीआयकडून करण्यात आली आहे. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, तोशाखाना हा पाकिस्तानमधील एक सरकारी विभाग आहे, जेथे इतर सरकारांचे प्रमुख, राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, नोकरशहा आणि अधिकारी यांना परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. पंतप्रधान असताना इम्रान खान यांच्यावर तोशाखानात ठेवलेल्या भेटवस्तू कमी किमतीत खरेदी केल्याचा आणि नंतर नफा मिळवण्यासाठी त्या विकल्याचा आरोप होता. या प्रकरणी आता ट्रायल कोर्टाने इम्रान खान यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान