शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारत करु शकतो तर आपण का नाही?, पाकिस्तानी नेता म्हणाला...विकासासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 12:49 IST

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नेमकं आपलं चुकलं कुठे यावर चर्चा सुरू झाली आहे. शेजारचा भारत इतका पुढे गेला आणि आपण विनाशाच्या उंबरठ्यावर आलो आहोत, अशी भावना पाकिस्तानातील नेते व्यक्त करत आहेत. आता पाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी एक मोठं विधान केलं आहे. एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले की, पाकिस्तानला आपल्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, तसंच शिक्षण प्रणाली सुधारण्याची गरज आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी 'रिइमॅजिनिंग पाकिस्तान' या चर्चासत्राला संबोधित करताना आपलं मत मांडलं. "भारत, बांगलादेश आणि इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये जन्मदर पाकिस्तानपेक्षा खूपच कमी आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे ५५ लाख मुले जन्माला येतात आणि पाकिस्तानमधील जन्मदर जगात सर्वाधिक आहे. जर पाकिस्तानचा जन्मदर गेल्या दहा वर्षांत बांगलादेशच्या बरोबरीचा असता तर पाकिस्तानचे दरडोई उत्पन्न १० टक्क्यांनी वाढले असते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाकिस्तान मानव विकास निर्देशांकात तळाशी आहे. आफ्रिकन देशांपेक्षाही खाली गेला आहे. शाश्वत आणि जलद विकासासाठी पाकिस्तानला लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल", असं मिफ्ताह इस्माइल म्हणाले. 

शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं गरजेचंपाकिस्तानच्या माजी अर्थमंत्र्यांनी देशाच्या विकासासाठी शिक्षणावर भर देण्यावर लक्ष केंद्रीत केलं. ते म्हणाले की, पाकिस्तानातील ५० टक्के मुले शाळेत शिकत नाहीत. पाकिस्तानमध्ये केवळ ४४ टक्के मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेतात, तर भारतात हे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. जग भारताच्या आयआयटीला उच्च दर्जाचं मानते. आता पाकिस्तानच्या माजी मंत्र्यानेही कबूल केले आहे की भारतातील आयआयटी जगातील सर्वोच्च संस्थांमध्ये आहे आणि या संस्थांमधून शिकलेले लोक आज जगातील सर्वोच्च कंपन्यांचे सीईओ आहेत. भारतात सर्व उत्तम विद्यापीठे सुरू होत असताना, पाकिस्तानातील सरासरी तरुण तीन महिन्यांचा डिप्लोमा करत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारल्याशिवाय पाकिस्तानची प्रगती होऊ शकत नाही, असं मिफ्ताह इस्माईल म्हणाले.

महिला सक्षमीकरण आवश्यकमहिला सक्षमीकरणावरही मिफ्ताह इस्माईल यांनी भर दिला. बांगलादेशच्या निर्यातीत वाढ झाल्याचे श्रेय त्यांनी महिला शिक्षणाला दिले. देशाच्या ५० टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करून पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. मिफ्ताह इस्माईल म्हणाले की, जर भारत आणि बांगलादेश हे करू शकत असतील तर आपणही चांगल्या नेतृत्वाच्या जोरावर ते करू शकतो. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान