शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:09 IST

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा एकदा सिंधू जल करारावरुन भारताला इशारा दिला आहे.

India Pakistan War ( Marathi News ) : गेल्या दिवसापासून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला तणाव आता निवळला आहे. युद्धविरामावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी एकमेकांशी चर्चा केली आहे आणि युद्धविरामला हिरवा कंदील दाखवला. युद्धविरामला अंतिम स्वरूप देऊन काही तासच उलटले तोच पाकिस्तानी मंत्र्यांनी पुन्हा एकदा युद्धविरामाचे उल्लंघन करण्याचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे.

जर भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाद मिटला नाही तर हा युद्धविराम फार काळ टिकणार नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी म्हटले आहे.

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

पाकिस्तानी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, इशाक दार म्हणाले की, "जर पाण्याच्या वाटपावर कोणताही करार झाला नाही तर 'अॅक्ट फॉर वॉर' मानले जाईल. त्यांनी काश्मीर प्रश्नाला या संपूर्ण लढाईचे मूळ कारण असल्याचेही सांगितले.

सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपावरून दोन्ही देशांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू पाणी करार रद्द केला. पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संघर्षाचे कारण बनला आहे.

सिंधू जल करार काय होता?

१९६० च्या सिंधू जल करारानुसार, पाकिस्तानला सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांचे पाणी देण्यात आले आणि भारताला रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी देण्यात आले. २२ एप्रिल रोजी पुलवामा हल्ल्यानंतर भारताने हा करार रद्द केला. १२ मे रोजी झालेल्या युद्धविराम अंतर्गत, दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला न करण्याचे मान्य केले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

शोपियानसह विविध भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम राबवली जात आहे. मंगळवारी(13 मे) सकाळी अशाच एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी शोपियानच्या जामपाथरीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेले दहशतवादी पहलगाम हल्ल्यातील दोषी नव्हते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दल वेगवेगळ्या ठिकाणी विशेष मोहिमा राबवत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत