शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

Pakistan Flood: पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:13 IST

Pakistan Flood: पाकिस्तान सध्या भीषण महापुराचा सामना करत आहेत, यामुळे सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित केली आहे.

Flood in Pakistan: शेजारी देश पाकिस्तान सध्या भीषण पुराचा सामना करत आहे. या महापुरामुळे पाकिस्तान सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' जाहीर केली आहे. सध्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देणग्या मागितल्या जात आहेत. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचा युनायटेड किंग्डम दौरा रद्द केला असून ते कतारहून परतल्यानंतर पूर मदत कार्याचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करणार आहेत.

देशात आणीबाणीची घोषणामाहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेबने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात देशातील पूरस्थिती ही राष्ट्रीय आणीबाणी असल्याचे म्हटले आहे. बलुचिस्तान आणि सिंधमधील पुरामुळे झालेल्या विध्वंसाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय भावनेची आवश्यक असल्याचे मंत्री म्हणाले. देशात पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 343 मुलांसह 937 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर किमान 30 दशलक्ष लोक बेघर झाले आहेत.

पूरग्रस्तांसाठी दानाचे आवाहन

समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी परदेशी पाकिस्तानी नागरिकांसह त्यांनी इतर देशाला दान देण्याचे आवाहन केले आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला विनाश लक्षात घेऊन मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. कतारच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले शाहबाज शरीफ देशातील पूरपरिस्थिती पाहता परतीच्या मार्गावर आहेत.

पंतप्रधानांचा यूके दौरा रद्दपंतप्रधानांनी आपला ब्रिटनचा खाजगी दौरा रद्द केला आहे. सम टीव्हीच्या वृत्तानुसार, ते कतारहून लंडनला आपल्या नातवाच्या उपचारासाठी जाणार होते. पण, आता ते देशात परतणार आहेत. शरीफ यांनी एका आपातकालीन बैठकीचे आयोजन केले असून, यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह सर्व संबंधित अधिकारी पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदतीसाठी उचललेल्या पावलांची माहिती देतील.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरDeathमृत्यू