शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:42 IST

Pakistan vs Hamas: असीम मुनीरच्या मोसाद अन् CIA सोबत गुप्त बैठका झाल्याचाही दावा

Pakistan vs Hamas: इंटरनेशन स्टॅबेलाइजेशन फोर्स (ISF)चा भाग म्हणून पाकिस्तान गाझा पट्टीत २०,००० जवानांचे सैन्य पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली आहे. हमासचा खात्मा करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाकार्याने हे दल तयार केले जात आहे. अहवालानुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे लष्कर अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील गुप्त कराराचे अनुसरण करू शकते. जर असे झाले तर ते पाकिस्तान आणि इस्रायलमधील संबंधांमध्ये एक ऐतिहासिक बदल घडून येऊ शकेल.

मुनीरच्या मोसाद आणि CIA सोबत गुप्त बैठका

जर पाकिस्तानने खरोखरच गाझामध्ये सैन्य पाठवले तर या निर्णयाला इराण, तुर्की आणि कतार सारख्या देशांकडून तीव्र विरोध होऊ शकतो. कारण हे तिन्ही देश दीर्घकाळापासून हमासचे समर्थक आहेत. सीएनएन-न्यूज१८ च्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी अलीकडेच इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद आणि अमेरिकन सीआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका केल्या. या बैठकीमध्ये गाझामध्ये पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यावर सहमती झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की ही संपूर्ण योजना एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व धोरणात्मक बदलाचा भाग आहे.

गाझामध्ये पाकिस्तानी सैनिकांची भूमिका काय असेल?

सूत्रांचा असा दावा आहे की, पाकिस्तानी सैन्याचे खरे ध्येय हमासला निष्क्रिय करणे आणि गाझामध्ये पूर्वपरिस्थिती स्थापित करणे हे असेल. मानवतावादाची पुनर्बांधणी असे या मोहीमेचे वर्णन केले जाणार आहे. पण वास्तविक उद्देश इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्या सशस्त्र गटांमध्ये बफर झोन तयार करणे असल्याचे म्हटले जाते. म्हणूनच हे सैन्य अमेरिकेच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्थिरीकरण दलाचा (ISF) भाग असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan to eliminate Hamas? US's move; 20,000 troops to Gaza?

Web Summary : Pakistan may deploy 20,000 troops to Gaza as part of a US-backed force to neutralize Hamas. This follows reported secret meetings between Pakistan's army chief and Israeli, American intelligence officials, potentially reshaping Pakistan-Israel relations. Opposition from Hamas supporters is expected.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध