शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Crisis: पाकिस्तानची अडचणी आणखी वाढणार! सेंट्रल बँक उचलणार मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 14:19 IST

गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानच्या संकटात आणखी भर पडली आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार काहीही करण्यास तयार असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानच्या संकटात आणखी भर पडली आहे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकार काहीही करण्यास तयार असल्याचे दिसत आहे. मदतीसाठी आयएमएफने घातलेल्या कठोर अटीही स्वीकारल्या जात आहेत. दरम्यान, आधीच पाकिस्तानच्या महागाईच्या आगीत जनता होरपळून  निघाली आहे. नुकत्याच झालेल्या कराचा मोठा फटका बसल्यानंतर आता पाकिस्तानची सेंट्रल बँक मोठ पाऊल उचलणार आहे. 

पाकिस्तानमध्ये व्याजदर वाढवण्याची तयारी केली जात आहे आणि त्यात 20-50 बेसिस पॉईंटने वाढ केली जाऊ शकत नाही, पण पूर्ण 200 बीपीएसने वाढविली जाऊ शकते. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान, पाकिस्तानची मध्यवर्ती बँक, पुढील आठवड्यात ऑफ-सायकल रिव्ह्यूमध्ये व्याजदरात 200 बेस पॉइंट्सने वाढ करण्याची तयारी करत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेजारील देशात सध्याचा व्याजदर 17 टक्के आहे.  कमालीच्या महागाईमुळे आधीच पीठ, तेल-गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आता पुन्हा एकदा देशातील जनतेला मोठा फटका बसणार आहे.

पाकिस्तानची सेंट्रल बँक जी पावले उचलणार आहे, त्यामुळे देशातील लोकांच्या अडचणी वाढणार हे नक्की आहे.  पाकिस्तानचा परकीय चलन साठा 3 अब्ज डॉलरच्या खाली पोहोचला आहे आणि त्यात सातत्याने घट होत आहे. चीनने पाकिस्तानला 700 डॉलर मिलियनची हमी दिली असली तरी IMF कडून 1.1 बिलियनची मदत अडकली आहे, जी सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अपुरी आहे. पाकिस्तान IMF निधी मिळविण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहे. यामध्ये कर वाढवणे, सबसिडी काढून टाकणे आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. आता व्याजदरात वाढ करण्याचा निर्णयही याच दिशेने टाकलेले पाऊल आहे.

पाकिस्तानमधील आयएमएफचे निवासी प्रतिनिधी एस्थर पेरेझ रुईझ यांनी या पावलाबाबत म्हटले आहे की, जागतिक संघटना पाकिस्तानमधील वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी आर्थिक धोरणाचा वापर करण्यासही समर्थन देते.

रशियाला पराभूत करण्यासाठी अमेरिकेने खजिना उघडला! सहा देशांवर खर्च केलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम एकट्या युक्रेनला

पाकिस्तानातील महागाईचा दर पाहिला तर महागाईचा दर 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गॅसपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंतचे भाव गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्याने 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईने वर्षभराच्या आधारे 41.54% या नवीन उच्चांक गाठला आहे . 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान