शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान कर्माने बुडाला! श्रीलंकेलाही मागे टाकणार, एकाच झटक्यात पेट्रोल 83, डिझेल 119 रुपयांनी महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:18 IST

सध्या पाकिस्तानातील पेट्रोलचे १ एप्रिलचे दर 149.86 रुपये आणि डिझेलचा दर 144.15 रुपये आहे. नव्या सरकारसमोर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारपासून मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवळखोरीच्या उंबरठ्यावर महागाईला थोपवून धरलेला पाकिस्तान लवकरच धारातीर्थी पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संकट होते, याच आठवड्यात पाकिस्तानला नवीन पंतप्रधान मिळालेला आहे. असे असले तरी पाकिस्तानची परिस्थिती श्रीलंकेसारखी होण्याची दाट शक्यता आहे. 

दहशतवाद आणि भारतद्वेष यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यामुळे पाकिस्तानी जनतेवर महागाईचा अणुबॉम्ब फोडण्याची तयारी सुरु झाली आहे. जर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला तर पाकिस्तानातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती एकाच झटक्यात दुप्पट होणार आहेत. 

पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर ठरविणारी संस्था Oil and Gas Regulatory Authority (OGRA) ने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शनिवारपासून मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ओजीआरएच्या प्रस्तावानुसार पेट्रोलच्या दरात 83.5 रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 119 रुपये प्रती लीटर दरवाढ करण्याचा सल्ला आहे. 

सध्या पाकिस्तानातील पेट्रोलचे १ एप्रिलचे दर 149.86 रुपये आणि डिझेलचा दर 144.15 रुपये आहे. या प्रस्तावानुसार पेट्रोलचा दर 233 रुपये आणि डिझेलचा दर  263 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. या संस्थेने आणखी एक प्रस्ताव दिला आहे. पहिल्या प्रस्तावात ग्राहकांवर कराचे ओझे वाढविणे आणि दुसऱ्या प्रस्तावात ग्राहकांवर कमी प्रमाणावर कराचे ओझे टाकले जाते. या दुसऱ्या प्रस्तावानुसार पेट्रोलच्या दरात २१ रुपयांची वाढ आणि डिझेलच्या दरात ५१ रुपयांची वाढ प्रस्तावित केली आहे. आता शाहबाज शरीफ कोणता प्रस्ताव निवडतात हे लवकरच समजणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ