शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आता वर्ल्ड बँकेनं दिला ४४० व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 10:23 AM

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत चालली आहे.

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा (Pakistan Economic Crisis) सामना करत आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानची परिस्थिती बिकट होत चाललीये. महागाईनं सर्व विक्रम मोडीत काढत ४८ वर्षांच्या उच्चांकी पातळी गाठली असून त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. परकीय चलनाच्या घटत्या गंगाजळीमुळे पाकिस्तानला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आयात करणं शक्य होत नाही. त्यामुळे लोकांना मैदा, तांदूळ यासारख्या दैनंदिन वस्तू मिळू शकत नाहीत. या वस्तू मिळत असल्या तरी त्यांना सामान्यांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक पैसे मोजावे लागतात. दरम्यान, अशातच आता जागतिक बँकेनं पाकिस्तानला दणका दिला आहे.आता पाकिस्तान दिवाळखोर घोषित होणं निश्चित! अमेरिकेच्या या अहवालातून झाला मोठा खुलासा

जागतिक बँकेने पाकिस्तानचा विकास दर कमी केला आहे. जागतिक बँकेनं पाकिस्तानचा विकास दर २ टक्क्यांवरून ०.४ टक्क्यांवर आणला आहे. द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जागतिक बँकेनं म्हटलंय की, विविध आर्थिक धक्क्यांमुळे या आर्थिक वर्षात सुमारे ४ दशलक्ष पाकिस्तानी नागरिक गरिबीत गेले आहेत.

बेल आऊट पॅकेजही नाहीया आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला आयएमएफच्या बेलआउट पॅकेजची मोठी गरज आहे. मात्र पाकिस्तानला अद्याप हे पॅकेज मिळालेलं नाही. पाकिस्तान सरकार १.१ अब्ज डॉलर्सचं बेलआउट पॅकेज मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी आयएमएफच्या सर्व अटीही मान्य केल्यात. मात्र त्यांना अद्याप पॅकेज मिळालेलं नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार १० एप्रिल रोजी होणाऱ्या IMF बैठकीत सहभागी होणार होते.

रिपोर्टनुसार, देशांतर्गत राजकीय गोंधळामुळे त्यांनी वॉशिंग्टनचा दौरा रद्द केलाय. १.१ अब्ज डॉलरच्या बेलआउट पॅकेजसाठी ही बैठक आवश्यक होती. २०१९ मध्ये मंजूर केलेल्या ६.६ अब्ज डॉलरपैकी पाकिस्तान १.१ अब्ज डॉलरचा निधी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपन्यांचा काढता पायआयएमएफकडून बेलआउट पॅकेजला झालेल्या विलंबामुळं पाकिस्तानी रुपयाची किंमत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २८४ रुपयांवर पोहोचली आहे. पाकिस्तानमधील आर्थिक संकटाच्या काळात महागाईनंही पाच दशकांचा विक्रम मोडला आहे. वार्षिक आधारावर, मार्चमध्ये महागाईचा दर ३५.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे. संकटाच्या काळात पाकिस्तानमधील मोठ्या कंपन्या आपला व्यवसाय बंद करत आहेत. यापूर्वी होंडासह अनेक प्रकल्पांनी काढता पाय घेतला होता.

कर्जाचं ओझंपाकिस्तानवरील एकूण कर्ज आणि दायित्व (Pakistan Debt) ६० ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे देशाच्या जीडीपीच्या ८९ टक्के आहे. त्याच वेळी, यापैकी सुमारे ३५ टक्के कर्ज हे केवळ चीनचंच आहे, त्यात चीनच्या सरकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश आहे. पाकिस्तानवर चीनचं ३० अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे, जे फेब्रुवारी २०२२ मध्ये २५.१ अब्ज डॉलर्स होतं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँक