शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पाकिस्तानमध्ये आर्थिक 'अंधार'! बाजार, रेस्टॉरंट्स लवकर बंद; सरकारी कर्मचाऱ्यांवर 'वर्क फ्रॉम होम'ची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 23:12 IST

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस दिवाळखोरीच्या दिशेनं वाटचाल करत आहे.

पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस दिवाळखोरीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. वीज संकट ही पाकिस्तानात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जा संवर्धन योजनेंतर्गत सरकारने सर्व मॉल्स आणि मार्केट रात्री ८.३० वाजेपर्यंत बंद झाले पाहिजेत, असे आदेश दिले आहेत. तसंच लग्न समारंभाचे हॉल देखील रात्री लवकर बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत. देशाचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, आर्थिक संकटात देशाचे सुमारे ६२ अब्ज पाकिस्तानी रुपये वाचवण्याचं सरकराचं उद्दिष्ट आहे. महागाईच्या दबावामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानचा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) डिसेंबरमध्ये २४.५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीसाठी १२.३ टक्के इतका होता.

पाकिस्तानात वाढती महागाईपाकिस्तानच्या चलनवाढीचा दर अर्थ मंत्रालयाच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता असे वृत्त जिओ न्यूजने दिले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमतींवर झालेला परिणाम, देशातील विनाशकारी पुरामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि चलनाची घसरण यामुळे पाकिस्तानातील महागाई वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

अहवालानुसार, गेल्या महिन्यात देशातील खाद्यपदार्थांच्या महागाईत शहरांमध्ये ३२.७ टक्के आणि गावे/शहरांमध्ये ३७.९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत नाशवंत अन्न उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय वाढ दर्शवते.

पाकिस्तान सध्या गंभीर संकटातदोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर म्हणाले, पाकिस्तान सध्या गंभीर टप्प्यातून जात आहे. देशासमोर अर्थव्यवस्था आणि दहशतवाद हे मोठे आव्हान आहे. मुनीर यांनी दहशतवाद आणि अर्थव्यवस्था या दुहेरी समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लाइट नाहीपाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती देताना सर्वांना वीज वाचवण्याचं आवाहन तर केलंच. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक देखील सकाळी घेण्यात आली आणि वीजेचा वापर करण्यात आला नसल्याचंही सांगितलं. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान