शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राफेलचा भारतीय हवाई दलात समावेश होताच पाकिस्तान बिथरला; चीनला म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 16:08 IST

राफेल विमानं भारतीय हवाई दलात येताच पाकिस्तानची चिंता वाढली

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमानांचा आज भारतीय हवाई दलात समावेश झाला आहे. यामुळे भारताचं सामर्थ्य वाढलं आहे. तर शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची झोप उडाली आहे. BVRAAM (व्हिज्युअल रेंजच्या बाहेर) मीटियर मिसाईलसह सज्ज असलेलं राफेल आशियातलं सर्वात सामर्थ्यशाली लढाऊ विमानं मानली जातात. राफेलच्या हवाई दलातील समावेशामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता पाकिस्ताननं चीनकडे मदत मागितली आहे. अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि क्षेपणास्त्र देण्याची मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडालीपाकिस्ताननं चीनकडे ३० जे-१० सीई लढाऊ विमानं आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं मागितली आहेत. पाकिस्तान २०१० पासूनच जे-१० लढाऊ विमानांची मागणी करत आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान जेएफ-१७ च्या उत्पादनात व्यस्त असल्यानं ही मागणी मागे पडली. मात्र आता भारतीय हवाई दलात राफेलचा समावेश झाल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा चीनकडे जे-१० सीई विमानांची मागणी केली आहे. यासोबतच लघु आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणाऱ्या पीएल-१० आणि पीएल-१५ क्षेपणास्त्रांसाठीही पाकिस्ताननं चीनसोबत बातचीत सुरू केली आहे.VIDEO: बलसागर भारत होवो! राफेलचा हवाई दलात समावेश; भारताचं सामर्थ्य वाढलंअमेरिका आणि भारत जवळ आल्यानं आता पाकिस्तानकडे चीनकडून मदत मागण्याचा पर्याय शिल्लक आहे. जे-१० सीई चिनी हवाई दलातील जे-१० विमानाची निर्यात आवृत्ती आहे. यामध्ये एईएसए रडार, फायर कंट्रोल सिस्टमचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलात सध्या १२४ जेएफ-१७, ७० एफ-१६ आणि मिराज ३ ए विमानं आहेत. पाकिस्तानला चीनकडून जे-१० सीई विमानं मिळाल्यास भारतासाठी ते आव्हान ठरू शकतं.लडाखमध्ये राफेलच्या उपस्थितीनं चीन घाबरला, तैनात केली जे-20 विमानं राफेल विमानांचा भारतीय हवाई दलात समावेशआज राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत राफेल विमानं भारतीय हवाई दलात सामील झाली. अंबालामधील हवाई तळावर हा सोहळा संपन्न झाला. राफेल विमानं अवघ्या अर्ध्या तासात अंबाला ते पूर्व लडाखमधील पँगाँगपर्यंतचं अंतर कापू शकतात. सध्या याच परिसरात चीनच्या कारवायांमुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे भारतात आलेली पाच राफेल विमानांची पहिली तुकडी याच हवाई तळावर सज्ज ठेवण्यात आली आहे. राफेल विमानाची वैशिष्ट्य: 

राफेलची मारक क्षमता ३७०० किलोमीटर इतकी आहे. हे विमान २२३० किलोमीटर प्रतितास वेगाने उडण्याची क्षमता आहे. स्नेकमा एम 88-2 टर्बोफॅन इंजिन विमानाला ताशी 2हजार 230  वेग प्रदान करतात. 

*राफेल विमानाचे एव्हीयोनिक्स त्याला उडण्याची उच्च क्षमता प्राप्त करून देतात. काही वेळातच ते जवळपास 65 हजार फुटांपर्यंत म्हणजे 20 हजार फुटांपर्यंत पोहचू शकते. विमानाची इंधन क्षमता जवळपास 17 हजार लिटर आहे.  

* राफेल लढाऊ विमानांमध्ये जगातील सर्वात आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मीटिआर क्षेपणास्त्र  आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 150 किमी पर्यंत आहे. लक्ष्याचा अचूक वेध हे हत्यार घेऊ शकते. म्हणजे भारतीय हवाई हद्द न ओलांडता शत्रूच्या सीमेत ते हल्ला करू शकते.* राफेलमध्ये स्काल्प नावाचे दुसरे सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 600 किलो मीटर एवढी आहे. हे विमान एका वेळेला 14 लक्ष्यांवर मारा करू शकते. तसेच सहा हजार किलोग्राम शस्त्रास्त्र वाहून नेण्या नेण्याची क्षमता विमानात आहे.

* राफेल विमानात तिसरे महत्त्वाचे क्षेपणास्त्र म्हणजे हॅमर. 

हॅमर क्षेपणास्त्राची मारक क्षमता 60 ते 70 किमी आहे. ते हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ला करू शकते. डोंगराळ प्रदेशातील शत्रूंचे बंकर हे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही क्षेपणास्त्र घेण्याचा निर्णय घेतला आहे फ़्रेंच वायू दल आणि नौदलासाठी हे विकसीत करण्यात आले आहे. भारताने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा कारारही फ्रान्स बरोबर केला आहे. 

*राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती. राफेल विमान कुठल्याही हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.

* अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज क्षेपणास्त्र हल्यासाठी विमान सक्षम आहे. 

* भारताला मिळणाऱ्या राफेल विमानात इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले, रडार वॉर्निंग रिसिव्हर्स, लो बॅण्ड जॅमर्स, 10 तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, इन्फ्रा-रेड सर्च, ट्रॅकिंग सिस्टम हे बदल करण्यात येणार आहे. 

चीनच्या जे 20 विमानापेक्षा सक्षम असल्याचा दावा

चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करत रशियाच्या विमानाच्या तंत्रज्ञावर आधारित स्वदेशी विमाने बनवली आहे. सध्या जगातील सर्व हवाई दले ही पाचव्या पिढीतील विमाने वापरत आहेत. चीनकडे चेंगडू जे-20 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. पाचव्या पिढीतील विमाने ही इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली आणि शत्रूच्या रडार यंत्रानेपासून वाचू शकते. यामुले या विमानाला स्टेल्थ क्षमता प्राप्त होते. जे 20 विमाने चेंगडू एरोस्पेस कॉर्पोरेशन ने बनवलेले आहे. या विमानातील तंत्रज्ञान आणि रडार यंत्रणेमुळे हे जगातील उत्तम विमान असल्याचा दावा चीनने केला होता. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीत ते अद्याप वापरले गेले नसल्याने या विमानाच्या क्षमतेबाबत जागतिक स्तरावर शंका उपस्तीत केल्या जातात. राफेल आणि जे 20 विमानाचा विचार केल्यास राफेल विमानातील  युद्ध प्रणालीने युद्ध भूमीत स्वताला सिद्ध केले आहे. त्यामुळे भारताला चिनी वायुदलाला तोंड देणारा नवा योद्धा मिळलेला आहे, हे नक्की. 

या युद्धात राफेलने केले स्वतःला सिद्ध

चीनचे जे 20 हे पाचव्या पिढीतील विमान असले तरी ते कुठल्याच युद्धात वापरले गेले नाही त्या तुलनेत राफेल विमान हे अफगाणिस्तान – तालिबान युद्धाच्या वेळी हे सर्वप्रथम वापरण्यात आले.  २०११ मध्ये लिबियावर टेहळणी करण्यासाठी आणि हवाई हल्ला करण्यासाठी हे विमान वापरले गेले. या युद्धात राफेलची क्षमता जगाला कळाली.  २०१३ मध्ये देखील दशतवाद्यांच्या विरोधात मालीच्या सरकारला मदत म्हणून फ्रांसने हस्तक्षेप केला त्या वेळेस देखील युद्धात राफेल  वापरले गेले. 

 २०१४ मध्ये सप्टेंबर महिन्यात इस्लामिक सेट्स च्या  विरोधात जेव्हा फ्रांसने राफेल वापरले. तसेच इराक वरील हमल्याच्या वेळेस अमेरिकेच्या लष्करात देखील राफेलचा  समावेश करण्यात आला होता. 

राफेलची आणखी काही वैशिष्ट्ये

राफेल हे दोन इंजिन असलेले विमान आहे. यात दोन वैमानिक बसू शकतात.   विमानाची लांबी १५.२७ मी. ( ५०.१ फुट. ),  उंची : ५.३४ मी. ( १७.५ फुट ) आणि पंखांची लांबी : १०.८० मी. ( ३५.४ फुट. ) एवढी आहे. राफेलच्या पंखांच क्षेत्रफळ : ४५.७ स्क़्वे.मी. ( ४९२ स्क्वे.फुट ) आहे. विमान हवेत उडणार , त्याला जास्तीत जास्त गती मिळावी याचा विचार करताना आपल्याला विमानाच्या वजनाचा विचार करावाच लागतो. राफेलचे निव्वळ वजन आहे १०३०० किग्रॅ . ( २२७०० पाउंड्स )  आणि सामानासहित वजन आहे  १५०००किग्रॅ ( ३३००० पाउंड्स ) आणि या विमानाची इंधन क्षमता  ४७०० किग्रॅ ( १०३६० पाउंड्स ) एवढी आहे.

जगातील पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने

तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेचे वायुदल जगात पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर रशियन वायुदलाचा क्रमांक लागतो अमेरिकेकडे एफ सिरीज मधील चवथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने आहेत. अमेरिकेचे एफ 21, एफ 35 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. जगातील सर्वाधिक सक्षम विमान हे एफ 22 विमाने आहेत. अफगाणिस्तान आणि इराक युद्धात या विमानांनी त्याच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. नौदलाच्या दृष्टीनेही या विमानांत अनेक बदल करण्यात आले आहे.

रशिया कडील सुखोई आणि मिग विमाने ही चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने आहेत. सुखोई 35, सुखोई 37 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. भारत सुखोई एमकेआय 30 ही रशियन बनावटीची आधुनिक विमाने वावरत आहे. आता फ्रान्स निर्मित राफेल पाचव्या पिढीतील विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली आहे

सहाव्या पिढीतील विमानाचे प्रोजेक्ट

अमेरिका, रशिया, जपान, चीन, फ्रान्स, भारत हे राष्ट्र सध्या सहाव्या पिढीतील विमानांच्या प्रकल्पावर काम करत आहेत. भारत आणि रशिया हे सुखोई 57 या प्रकल्पावर एकत्रित काम करत होते. सुखोई 57 हे सर्वाधिक आधुनिक विमान समजले जाते. सध्या या प्रकल्पावर काम सुरू आहे. यातील खर्च जास्त असल्याने भारत या प्रकल्पातून बाहेर पडला. चीन जे 21 या प्रकल्पावर काम करत आहे. तर अमेरिका एफ 22 या विमामांवर काम करून सहाव्या पिढीतील विमाने बनवत आहेत. 

भारतीय वायू दलासाठी गौरवाचा क्षण 

भारतीय वायू दलाला जवळपास 20 वर्षांनी नवी विमाने मिळाली आहे. आम्ही जेव्हा वायू दलात होतो तेव्हा सर्व मदार ही मिग 21, मिग 23, मिग 27 या विमानांवर होती. ती हळू हळू निवृत्त होत असल्यामुळे नव्या विमानांची गरज भारतीय वायू दलाला होती. मात्र, नव्या विमानाची खरेदी प्रक्रिया राखडल्यामुळे भारतीय वायू दलालतील स्क्वाडर्न झपाट्याने कमी झाल्या. वायू दलात आज 31 स्क्वाड्रन आहेत. एका स्काड्रनमध्ये 24 विमाने असतात. मात्र, देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी जवळपास 42 स्काड्रनची गरज आहे. राफेल विमाने आल्यामुळे हळूहळू ही पोकळी भरून येणार आहे. भारतीय बनावटीची तेजस विमानेही वायू दलात दाखल होणार आहे. यामुळे आजच्या दिवस भारतीय वायूदलासाठी गौरवाचा आणि मानाचा आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलchinaचीन