भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलांचे कंबरडे मोडले होते. त्यातच बलुचिस्तानमधील बंडखोरांनीही पाकिस्तानी सैन्यदलांना जेरीस आणले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानने आपल्याच देशातील नागरिकांवर ड्रोनद्वारे हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान भागातील एका गावात पश्तून लोकांना लक्ष्य करून पाकिस्तानी सैन्याने ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर या भागात पाकिस्तान सरकारला तीव्र विरोध सुरू झाला आहे. तसेच विरोधी पक्षांतील खासदारांनीही शाहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे.