शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांना मोठा झटका, न्यायालयाने ९ जामीन अर्ज फेटाळले, आता पुढे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 18:52 IST

मंगळवारी इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) तीन जामीन अर्ज फेटाळले.

इस्लामाबादमधील पाकिस्तानच्या स्थानिक न्यायालयांनी माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान यांच्या नऊ याचिका फेटाळल्या आहेत. डॉनच्या वृत्तानुसार, हिंसक निदर्शने केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात जामिनाची मागणी करण्यात आली होती. मंगळवारी इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) तीन जामीन अर्ज फेटाळले. त्याचबरोबर, अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश (ADSJ) मोहम्मद सोहेल यांनी इम्रान खान यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी केलेल्या सहा याचिका फेटाळल्या.

जिओ न्यूजनुसार, न्यायाधीशांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इम्रान खान यांचा जामीन आणखी वाढवता येणार नाही. दुसरीकडे, न्यायाधीश मुहम्मद सोहेल यांनी निकाल जाहीर करताना सांगितले की, गेल्या वर्षी संसदीय मतदानाद्वारे सत्तेवरून हटवले गेलेले माजी पंतप्रधान प्रकरणांशी संबंधित तपासात सहभागी झाले तर ते सोयीचे होईल. दरम्यान, इम्रान खान यांच्याविरुद्ध खन्ना आणि बरकाहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, त्यांच्याविरुद्ध संघीय राजधानीतील कराची कंपनी, रामना, कोहसार, तरनूल आणि सचिवालय पोलिस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या वर्षी ९ मे रोजी भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांच्याअटकेनंतर हिंसक निदर्शने झाली होती. पक्षाच्या समर्थकांनी देशाच्या अनेक भागांमध्ये संरक्षण आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ले केले. त्यानंतर पीटीआयचे शेकडो कार्यकर्ते आणि नेत्यांना दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. अधिकार्‍यांनी इम्रान खान यांच्यावर हिंसक आंदोलनांचे सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.

गेल्या महिन्यात इम्रान खान यांना अटकदरम्यान, इस्लामाबादमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर अटक करण्यात आली. सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या निर्णयानंतर इम्रान खान यांना ५ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगात ठेवण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले. याचबरोबर, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) त्यांना दोषी ठरवल्यानंतर सार्वजनिक पदावर राहण्यास पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान