शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझहरला अजून एक दणका, यूनोच्या कारावाईनंतर पाकिस्ताननेही घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:13 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते.

इस्लामाबाद - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर आता   पाकिस्ताननेही त्याचावर मोठी कारवाई करताना त्याच्यावर बंदी घातली आहे.  भारतानेदहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला बुधवारी मोठे यश मिळाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते.   मात्र  अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. त्यामुळे अखेर आज अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. काश्मिरी तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या मसूद अझहरला अटक करण्यात आली होती. पुढे 1999 च्या कंदाहार विमान अपहरण नाट्यानंतर मसूद अझहरला भारत सरकारने मुक्त केले होते. त्यानंतर मसूद अझहरने पाकिस्तानात लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.    

टॅग्स :masood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी